राष्ट्रीय आरोग्य धोरण

राष्ट्रीय आरोग्य धोरण - स्वरूप
* भारताचे पहिले आरोग्यविषयक धोरण १९८३ [NHP-१९९३] साली जाहीर केले. २००२ साली दुसरे आरोग्यविषयक धोरण जाहीर करण्यात आले.

* प्राथमिक आरोग्य केंद्राचे जाळे कालबद्ध पद्धतीने विकसित करणे आणि त्याचा आरोग्य शिक्षणाशी संबंध प्रस्थपित करणे. आरोग्य स्वयंसेवकामार्फत आरोग्य सेवा पुरवठा करणे.

* विकेंद्रित आरोग्य सुविधा विकसित करणे. विशेष सेवा पुरविणारे दवाखाने खाजगी सहभागातून पुरविणे.

* १९८३ च्या आरोग्य धोरणामुळे देवीच्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यात आले. कुष्ठरोग, कला आजार, हत्तीरोग यांचेही नजीकच्या भविष्यात समूळ उच्चाटन करणायत आले.

* स्थूल फलन दर आणि बालमृत्यूदर यामध्ये लक्षणीय घट झाली आहे.


राष्ट्रीय आरोग्य धोरण २००२ - तरतुदी
* आरोग्यविषयक वित्तीय अडचणी - एकूण आरोग्यावर होणारा खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.२% असून यापैकी फक्त १७% खर्च सार्वजनिक असून उर्वरित ८३% खर्च खाजगी उत्पन्न यातून केला गेला आहे.

* विषमता - आरोग्य सेवांच्या उपलब्दतेनुसार राज्यांतर्गत खूप मोठ्या प्रमाणात विषमता असून प्रगत राज्यात सुविधांचे प्रमाण मागास राज्याच्या तुलनेत चांगले आहे.

* आरोग्य संशोधन - आरोग्यविषयक प्रश्नाबाबत जनमानसात जागृती करणे व आरोग्यविषयक प्रश्नावर संशोधन करणे याबाबतदेखील स्थिती असमाधानकारक आहे.


आरोग्य धोरणाची उदिष्टे
* आरोग्यविषयक सुविधांची उपलब्धता विकेंद्रित पद्धतीत विस्तारणे.

* आरोग्यविषयक सुविधांमध्ये समन्यायता आणणे, त्यासाठी मागास घटकांच्या आरोग्यास प्राधान्य देणे.

* केंद्र सरकारचा आरोग्य सुविधा पुरविण्यात सहभाग वाढविणे.

* खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे.


सन २००० - २०१५ साठी उदिष्टे
* २००५ पर्यंत पोलिओ निर्मुलन करणे.
* २००५ पर्यंत कुष्टरोग निर्मुलन करणे.
* २००७ पर्यंत एड्सचा शून्य विकास दर साध्य करणे.
* २०१० पर्यंत कला आजार निर्मुलन करणे.
* २०१० पर्यंत टी.बी मलेरिया मृत्यू दर ५० टक्क्यांनी कमी करणे.
* २०१० पर्यंत बालमृत्यूदर हजारी ३० पर्यंत आणणे.
* २०१० पर्यंत २५ टक्यापर्यंत केंद्रशासनाचा खर्च सहभाग वाढविणे.
* २०१० पर्यंत राज्याचा राज्याचा वाटा ५.५% पासून ८ टक्क्यापर्यंत वाढविणे.
* २०१५ पर्यंत हत्तीरोग नियंत्रित करणे.


धोरणात्मक बाबी
* वित्तीय तरतूद वाढविण्यात आली असून सन २०१० पर्यंत आरोग्य खर्चाचे प्रमाण राष्ट्रीय उत्पनाच्या ६ टक्क्यापर्यंत नेण्यात येणार
* आरोग्य सुविधाच्या उपलब्दतेनुसार विषमता घटविन्यावर भर देण्यात आला असून प्राथमिक आरोग्यासाठी ५५% निधी उपलब्द करून दिला जाणार आहे.
* आरोग्य परीसेवांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना महत्वपूर्ण औषधे दिली जाणार आहेत. डॉक्टर तसेच कर्मचार्यांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे.
* स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढविण्यावर सन २००२ च्या धोरणात भर आहे. विकेंद्रित सेवा देण्यासाठी हे आवश्यक आहे.
* आरोग्यविषयक माहिती व संशोधन यासाठी एकूण आरोग्य खर्चाच्या २% खर्च सन २०१० पर्यंत करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.
* खाजगी क्षेत्राचा व विमा व्याप्ती वाढविन्यावर भर दिला जाणार आहे.
* स्त्रियांचे व बालकांचे आरोग्य केंद्रित कार्यक्रमाचा महत्व दिले जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.