भारतीय लोकसंख्या - सद्यस्थिस्ती

भारतीय लोकसंख्येची संख्यात्मक संरचना
* देशातील हि लोकसंख्या महत्वाची भूमिका पार पाडत असते. एका बाजूला योग्य प्रमाणात असणारी लोकसंख्या एक महत्वाचे संसाधन ठरते. पण हिच लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढली कि एक समस्या ठरते. लोकसंख्या हि केवळ संख्यात्मक बाजू असणारी बाब नसून तिच्या गुणात्मक बाजू म्हणजेच शेक्षणिक स्तर आरोग्य या बाबी देखील महत्वाच्या असतात.

१.१.१ भारतीय लोकसंख्येची संख्यात्मक संरचना, आकारमान  व वृद्धीतील कल
सध्याची लोकसंख्या हि आर्थिक विकासात कशाप्रकारे योगदान देते किंवा भूमिका पार पाडते हे समजण्यासाठी हि बदलाची प्रवृत्ती अभ्यासावी लागते. 

* एकूण लोकसंखेचा आकार आणि त्यात दरवर्षी पडणारी भर फार महत्वाची असते. भारतीय लोकसंख्येचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या आकाराची आणि वाढीचा दर अधिक असणारी लोकसंख्या हे आहे. भारतीय लोकसंख्या सन १९२१ या वर्षापासून सातत्याने वाढत असून हा वाढीचा दर सन १९५१ नंतर म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळात अधिक वाढल्याचे दिसते. १९५१ साली भारतीय लोकसंख्या ३६.१ कोटी इतकी होती ती सन २०११ मध्ये १२१ कोटी १ लाख २४ हजार २४८ झाली. सन १९५१ नंतर लोकसंखेच्या वाढीचा दर सरासरी २% राहिला आहे. लोकसंख्येतील वाढ हि प्रामुख्याने जननदर आणि मृत्यूदर यातील फरकावर अवलंबून असते.

* सन १९५१ ते २००१ या काळात जननदराचे प्रमाण दरहजारी ४० ते २५ पर्यंत घटले तर मृत्यूदर दरहजारी २७ होता.  तो ८.४ पर्यंत प्रतिहजार घटला. मृत्यूदरात झालेली घट हि जननदरातील घटीपेक्षा अधिक असल्याने लोकसंखेच्या आकारात मोठी वाढ होत गेल्याचे दिसते. सन १९५१ ते १९७१ या दोन दशकात लोकसंख्या २.५% दराने वाढत होती, सन १९९१ ते २००१ या दशकात वाढीचा दर सन २००१ ते २०११ काळात वाढीचा दर १.६४% असा होता.

* वाढत्या लोकसंख्येची आणखी एक बाजू म्हणजे लोकसंख्येची वाढती घनता होय. दरचौरस कि मी क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात. यावरून लोकसंख्येची घनता मोजतात. १९५१ साली लोकसंख्येची घनता ११७ होती, तर १९९१ साली २७४ आणि २००१ साली ३२४ झालेली दिसते. इंग्लंड व जपान यांची लोकसंख्येची घनता अनुक्रमे २४७ व २२१ एवढी आहे म्हणून हे देश उच्च प्रगत आहेत.


भारतीय लोकसंख्येची वैशिष्टे
* भारतीय लोकसंख्येचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे प्रचंड मोठे आणि सातत्याने वाढणारे आकारमान होय.
* एकूण जागतिक लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतीय आहे. तर चीनचा वाटा १९.४% आहे.
* एकूण जागतिक भूभागापैकी फक्त २.४% भूभाग भारताच्या वाट्याचा आहे.
* प्रत्येक सहा व्यक्तीपैकी एक व्यक्ती भारतीय आहे.
* अमेरिकेपेक्षा आपली लोकसंख्या तिप्पट जास्त आहे. तर अमेरिकेकडे आपल्यापेक्षा तिप्पट जास्त जमीन आहे.
* भारतीय लोकसंख्या अनेक विकसित देशांच्या एकत्रित बेरजेपेक्षा मोठी आहे.
* लोकसंख्येबाबत चीननंतर भारताचा क्रमांक लागतो.
* भारतीय लोकसंख्येच्या इतिहासात सन १९२१ या वर्षाला एक वेगळे महत्व आहे. यालाच महाविभाजानाचे वर्ष असे म्हणतात. कारण त्यापूर्वी लोकसंख्या मंद वेगाने वाढत होती.
* परंतु सन १९२१ नंतर ती वेगाने वाढत आहे. लोकसंख्यावाढीचा दर सन १९२१ नंतर वाढला असून त्यामुळे लोकसंख्येचा भर गेल्याचे दिसते.


वाढत्या लोकसंख्येची कारणे
* लोकसंख्येत सातत्याने व मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. लोकसंख्येतील वाढ ही जननदर व मृत्युदर यातील फरकावर अवलंबून असते.

* लोकसंख्येतील मृत्यूदर व जननदर हे प्रतीहजारी मोजले जातात. जननदर २५ आहे याचा अर्थ दरवर्षी प्रतिहजारी मोजले जातात.

* जननदर व मृत्यूदर
[कालखंड]    [जननदर]   [मृत्युदर] 
१९०१-१०    ४८.१        ४२.६
१९११-२०    ४९.२        ४८.६
१९२१-३०    ४६.४        ३६.३
१९३१-४०    ४५.२        ३१.२
१९४१-५०    ३९.९        २७.४
१९५१-६०    ४०.०        २२.८
१९६१-७०    ४१.२        १९.०
१९७१-८०    ३७.२        १५.०
१९८१-९०    ३३.९        १२.५
१९९१-०१    २५.४         ८.४
२००१-०२    २५.०         ८.१
२०१०-११    २०.९७      ७.४८
* वरील आकडेवारीवरून असे स्पष्ट होते कि, जननदर सातत्याने उच्च पातळीवर राहिला असून त्यामध्ये दरहजारी ४९.२ ते २०.९७ अशी घट झालेली आहे. मात्र याच तुलनेत मृत्यूदर ४२.६ वरून ७.४८ असा लक्षनिय प्रमाणात घटला आहे.
* भारतीय जननदर इतर प्रगत देशाच्या तुलनेत दुप्पट किंवा त्याहून अधिक आहे.


उच्च जननदराची आर्थिक कारणे
भारतीय लोकसंख्येत भर घालण्याचे कार्य उच्च जननदरामुळे होते. हा उच्च जननदर विविध रूढी, परंपरा मोठ्या कौटूबिक आकारचे आर्थिक फायदे, गरिबी अशा विविध घटकाचे एकत्रित फलित आहे. उच्च जननदरामागे पुढील आर्थिक घटक जबाबदार आहे.

* गरिबी - लोकसंख्या वाढत असल्याने दारिद्रय किंवा गरिबी वाढत आहे असा समज आहे. प्रत्यक्षात मात्र गरिबी हेच लोकसंख्या वाढीचे कारण असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. गरिबीमुळे एकाची भर पडली तरी आर्थिक परिस्थितीत फारसा प्रतिकूल बदल होत नाही. उलट भविष्यकाळात त्याकडून आर्थिक लाभ होण्याचा संभव असतो. गरिबी नसलेल्या घरात नव्या मुलाचा जन्म अनेक प्रकारची आर्थिक जबाबदारी निर्माण करतो. [ शाळेचा प्रवेश, शिक्षणाचा खर्च ] त्यामुळे तेथे कुटुंब लहान ठेवण्याचा प्रयत्न होतो. गरिबी असल्यास असा प्रयत्न होत नसल्याने तेथे जननदर जास्त दिसतो.

* शेतीव्यवसायावर अवलंबून - एकूण रोजगारात शेतीचे स्थान मोठे आहे. ग्रामीण भागात शेती हाच मुख्य आधार आहे. शेतीत काम करण्यासाठी दुसऱ्यांदा घेण्यापेक्षा आपल्याच कुटुंबातील लोक असणे फायद्याचे ठरते. त्यामुळे शेतीव्यवसायावरील अवलंबन लोकसंख्येच्या वाढीला चालना देते. घरातील वाढत्या लोकसंख्येला शेतीतील रोजगारात सामावून घेतल्याने तो शेतीरोजगारात महत्वाचा आधार ठरतो.

* खेड्यांचा प्रभाव - जरी स्वातंत्र्य काळात ओद्योगीकरनाचे प्रयन्त झाले असले तरी त्याचा परिणाम म्हणून नागरीकरणात किंवा शहरीकरणात प्रभावी वाढ झाली नाही. शहरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण सन १९५०-५१ ते सन २०००-२००१ या काळात १७.६२% वरून २७.७८% एवढेच वाढले. रॉबर्ट कसेन मते शहरीकरणाच्या प्रक्रियेतून जननदर घटविणारे घटक प्रभावित होतात. परंतु हि प्रक्रिया अद्याप कार्यरत झालेली नाही.


उच्च जननदराची सामाजिक कारणे
* विवाहाचे अल्प वय - एन. सी. दास  यांनी केलेल्या अभ्यासावरून असे स्पष्ट झाले आहे कि विवाहाचे अल्प वय हे उच्च जननदराचे महत्वाचे कारण आहे. लहान वयात विवाह झाल्याने पुनरुत्पादन कालावधी वाढतो. जर विवाह २५ वर्षानंतर झाला तर जननदर कमी राहतो. परंतु भारतात अद्यापि स्त्रियांचे विवाह वय सरासरी १८ वर्षे आहे.

* अंधश्रद्धा - कुलदीपक मुलगाच हवा, त्यामुळेच मुक्ती मिळते अशा अंधश्रधेंणे  मुली कितीहि झाल्या तरीही मुलगाच हवा यासाठी आग्रह धरला जातो. तसेच प्रत्येकाने विवाह केलाच पाहिजे, या सामाजिक आग्रहाने लोकसंख्या वाढते.

* संयुक्त कुटुंबपद्धती - अद्यापही ग्रामीण भागात संयुक्त कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात दिसते. मुले सांभाळण्याची आर्थिक कुवत नसली तरीही एकत्र कुटुंब पद्धतीने हि बाब दुर्लक्षित होते. मुलाचा खर्च, सांभाळ एकत्रित कुटुंबात सहजरित्या होत असल्याने मोठ्या आकाराच्या कुटुंबास प्रोत्साहन मिळते. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलाची जबाबदारी व खर्च त्या संबधित पती - पत्नीलाच उचलावी लागते. त्यामुळे ते आपला भार मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात.

* स्त्री-शिक्षणाचे अल्प प्रमाण - भारतात अद्यापही निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. त्यातही स्त्री शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. अमर्त्य सेन यांनी असे स्पष्ट केले कि चीनमध्ये एक मुल धोरणाने जेवढा जननदर कमी केला तेवढाच परिणाम केरळमध्ये स्त्री साक्षरतेच्या प्रमाणातील वाढीने घटल्याने दिसते. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराबरोबर स्त्रीचा सामाजिक दर्जा वाढतो आणि कुटुंबात मुलांची संख्या मर्यादित होते. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, व राजस्थानच्या येथे स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असून तेथे जननदर अधिक असल्याचे दिसते.


मृत्यूदर घटण्याची कारणे
* दुष्काळ व साथीच्या रोगांवर नियंत्रण - स्वातंत्र्यापूर्वी दुष्काळ आणि साथीच्या रोगामुळे फार मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पडत असत. वाहतुकीची साधने विकसित नसल्याने दुष्काळात मोठ्या प्रमाणात प्राणहानी होत असे. दुसऱ्या बाजूला शास्त्रीय शोधांचा परिणाम म्हणून साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळाले आहे. देवी व प्लेग यासारख्या रोगांना पायबंद घातला गेला आहे, यामुळेही मृत्यूदर घटला आहे.

* आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ - ग्रामीण भागातही आता आरोग्याच्या सोयी झाल्यामुळे, तसेच शासनाने आरोग्यविषयक सुविधा वाजवी किमतीला उपलब्द करून दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय हि बाबदेखील मृत्यूदर घटविण्यास कारक ठरली आहे. अनेक आजारांनी सुरवात पिण्याच्या पाण्याशी निगडीत असते. लक्षात घेतले तर मृत्यूदर घटविण्यात त्याचे योगदान लक्षात येईल.

* लोकसंख्येतील निव्वळ वृद्धीदर उच्च - २० व्या शतकात प्रारंभी जननदर व मृत्यूदर उच्च असल्याने निव्वळ वृद्धीदर कमी होता. पण नंतरच्या काळात मृत्यूदर झपाट्याने घटला. पण जननदरात तुलनेने कमी घट झाल्याने लोकसंख्या वाढीचा निव्वळ दर वाढला.


लोकसंख्येतील स्त्री - पुरुष प्रमाण
भारतातील प्रतीहजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या
   वर्ष          स्त्रियांचे प्रती १००० प्रमाण
१९०१                    ९७२
१९११                    ९६४
१९२१                    ९५५
१९३१                    ९५०
१९४१                    ९४५
१९५१                    ९४६
१९६१                    ९४१
१९७१                    ९३० 
१९८१                    ९३४
१९९१                    ९२६
२००१                    ९३३
२०११                    ९४०


आयुर्मान
* सरासरी आयुर्मान हे त्या देशात जन्मणारी व्यक्ती सरासरी किती वर्षे जगते हे व्यक्त करते.
* त्या  व्यक्तीला उपलब्द होणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा, पोषक अन्न, सामाजिक व आर्थिक दर्जा अशा विविध घटकावर आयुर्मान अवलंबून असते.
* अपेक्षित आयुर्मान पुरुषाच्या बाबतीत ६२.९६ वरून ६६.१३ असे वाढले तर स्त्रियांच्या बाबतीत हीच वाढ ६३.३९ वरून ६८.८० अशी १९९६ ते २०१६ या वर्षात अपेक्षित आहे.
* अपेक्षित आयुर्मान सर्वाधिक ७०.६१ [१९९६-०१] ते ७२.०० पर्यंत [२०११-१६] पुरुषाबाबत होते.
* अपेक्षित आयुर्मान १९०१ ते १० या काळात फक्त २३ वर्षे होते १९६१ साली ४१ वर्षे १९७१ साली ५० वर्षे तर २००१ साली ६३ वर्षे आहे.


लोकसंख्येची ग्रामीण शहरी विभागणी किंवा नागरीकरण
* नागरीकरणामध्ये सन १९७१ पासून सातत्याने वाढ होत असून १९७१ साली नागरीकरणाचे प्रमाण २०.७% होते ते २००१ मध्ये २७.७८ असे वाढलेले दिसते.
* भारतातील नागरी भागात राहणाऱ्यांची एकूण संख्या फक्त चीनचा अपवाद सोडता इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे.
* १९५१ नंतर एकूण लोकसंख्या २.८४ पट वाढली असली तरीही नागरी लोकसंख्या मात्र ४.५८ पट वाढली आहे. नागरीकरणाचा दर अधिक असल्याचे स्पष्ट होते.
* शहरांची लोकसंख्या १९६१ साली २७०० होती. ती २००१ साली बदलल्याने ५,१०० झाली.
* नागरीकरणाबाबत विविध राज्यांच्या तौलनिक स्थितीत विशेष फरक दिसतो. १९८१ ते १९९१ या दशकात ओरिसा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, व राजस्थान या राज्यात नागरीकरणाचा वेग अधिक दिसतो.
* एकूण नागरी लोकसंख्येपैकी ३५% लोकसंख्या महाराष्ट्र, गुजरात, आणि तामिळनाडू येथे केंद्रित झाली आहे.
* नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे औद्योगीकीकरणासाठी आणि कृषी विकासासाठी करण्यात आलेली सार्वजनिक गुंतवणूक आहे.
* नागरीकरणाचा दर २०१०-१५ या काळासाठी २.४% अभिप्रेत आहे.


लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये
* लोकसंख्येच्या आकारापेक्षा लोकसंख्येची गुणवत्ता हि अधिक महत्वाची असते. आर्थिक विकासाचे संसाधन म्हणून जर वापर करावयाचा असेल तर लोकसंख्येचा गुणात्मक दर्जा ठरविणारे घटक प्रामुख्याने हे आहेत.
भारतातील साक्षरता प्रमाण
  वर्ष           साक्षरता
१९५१       १८.३३
१९६१        २८.३
१९७१       ३४.४५
१९८१       ४३.५७
१९९१       ५२.२१
२००१       ६४.८४
२०११       ७४.०४
* साक्षरतेचे प्रमाण १८.३३ वरून ७४.४ असे लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.
* स्त्री साक्षरतेचे प्रमाण ८.८६% होते ते ६५.४५% असे वाढले आहे.
* पुरुष साक्षरता प्रमाण २७.१६ टक्क्यावरून ८२.१४% असे वाढले आहे.
* निरक्षर लोकसंख्येचे प्रमाण ३५ टक्क्यावरून २६% असे २००१ ते २०११ या काळात घटले हि लक्षनिय बाब आहे. या काळात २२ कोटी लोक साक्षर झाले.
*  साक्षरतेतील स्त्री पुरुष भेद सन १९८१ पासून घसरत असून तो २६.६२% वरून आता १६.६८ असा घटला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.