महाराष्ट्राची जनगणना २०११

महाराष्ट्राची लोकसंख्या
२०११ सालच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. देशामध्ये लोकसंख्येत उत्तर प्रदेशाच्या खालोखाल महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. तर बिहारचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात देशातील ९.२९% लोकसंख्या आहे.

लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील पहिले आणि शेवटचे पाच जिल्हे २०११
पहिले पाच जिल्हे:[जिल्हे] -[लोकसंख्या] [टक्केवारी]
ठाणे -१,१०,५४,१३१ -९.८४%
पुणे  -९४,२६,९५९ - ८.३९%
मुंबई उपनगर -९३,३२,४८१ - ८.३०%
नाशिक  -६१,०९,०५२ -५.४४%
नागपूर -४६,५३,१७१ -४.१४%

शेवटचे पाच जिल्हे:
सिंधुदुर्ग -८,४८,८६८ -०.७६%
गडचिरोली -१०,७१,७९५ -०.९५%
हिंगोली-११,७८,९७३ -१.०५%
वाशिम -११,९६,७१४ -१.०६ % 
भंडारा -११,९८,८१०-१.०७%

महाराष्ट्रातील २०११ जणगणनुसार लोकसंख्येविषयी प्रमुख मुद्दे
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष लोकसंख्येचा जिल्हा ठाणे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात कमी पुरुष लोकसंख्येचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्री लोकसंख्येचा ठाणे जिल्हा आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री लोकसंख्याचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा.
* महाराष्ट्रातील एक कोटी लोकसंख्येवरील जिल्हा ठाणे होय.
* महाराष्ट्रातील २०११ च्या जणगणनेनुसार जास्त घनतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे,पुणे कोल्हापूर,
* महाराष्ट्रातील २०११ नुसार कमी घनतेचे पहिले पाच जिल्हे - गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ.
* २०११ च्या लोकसंखेच्या घनतेचा दर ३६५ आहे. तर राष्ट्रीय घनतेचा दर ३८२ आहे.
* महाराष्ट्रामध्ये देशातील ९.२९% एवढी लोकसंख्या राहते.
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर पहिले पाच जिल्हे - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदीया, सातारा, भंडारा,
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर शेवटचे पाच जिल्हे - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, मुंबई शहर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, बीड, जालना, धुळे.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, सिंधुदुर्ग, गोंदिया, अकोला.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, धुळे, बीड, जालना.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे पहिले जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे शेवटचे जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, जालना, बीड, परभणी.
* २०११ सालच्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या ६.१५ कोटी आहेत.
* एकूण लोकसंख्येशी टक्केवारी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तराच्या मानाने ग्रामीण लोकसंख्या १३.७७ टक्क्यांनी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५.०८ कोटी आहे.
* राष्ट्रीय स्तरावर नागरी लोकसंख्येची ३१.१६% एवढी आहे.
* महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येची टक्केवारी ४५.२३ एवढी आहे.
* महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर जिल्हे हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* गडचिरोली, सिंधुदुर्ग, आणि हिंगोली हे किमान नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे १००% नागरी जिल्हे आहेत.
* महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येची सर्वात जास्त टक्केवारी गडचिरोली ८९.००% असून त्या खालोखाल सिंधुदुर्ग व हिंगोली जिल्हा येतो.
* महाराष्ट्रात नागरी क्षेत्रात रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर ८२.८९% एवढा आहे.
* महाराष्ट्राची ग्रामीण दशवार्षिक वाढ १०.३४% एवढे आहे.
* महाराष्ट्राची नागरी दशवार्षिक वाढ  २३.६७% एवढे आहे.

महाराष्ट्र जिल्हानिहाय लोकसंख्या विषयक माहिती -(२०११)
[जिल्हा][लोकसंख्या(लाखात)][घनता][साक्षरता][स्त्रि-पुरुष(प्रमाण)]मुंबई शहर -३१.५ - २०,०३८ -८८.४८ -८३८
मुबई उपनगर -९३.३-२०,९२५ -९०.९० -८५७
ठाणे -११०.५ -१,१५७  - ८६.१८  -८८०
रायगड -२६.४ -३६८ -८३.८९ -९५५
रत्नागिरी -१६.१ -१९६ -८२.४३ -१,१२३
सिंधुदुर्ग -८.५ -३९३-८६.५४-१,०३७
नाशिक -६१.१-३९३-८०.९६-९३१
धुळे -२०.५-२८५-७४.६१-९४१
नंदुरबार -१६.५-२७६-६३.०४-९७२
जळगाव -४२.२-३५९-७९.७३-९२२
अहमदनगर -४५.४-२६६-८०.२२-९३४
 पुणे -९४.३-६०३-८७.१९-९१०
सातारा -३०.० -२८७-८४.२०-९८६
सांगली-२८.२-३२९-८२.६२-९६४
सोलापूर-४३.२-२९०-७७.७२-९३२
कोल्हापूर-३८.७-५०४-८२.९०-९५३
औरंगाबाद-३७.०४-३६५-८०.४०-९१७
जालना-१९.६-२५५-७३.६१-९२९
परभणी-१८.४-२९५-७५.२२-९४०
हिंगोली-११.८-२४४-७६.०४-९३५
बीड -२५.९-२४२-७३.५३-९१२
नांदेड-३३.६-३१९-७६.९४-९३७
उस्मानाबाद-१६.६-२१९-७६.३३-९२०
लातूर-२४.६-३४३-७९.०३-९२४
बुलढाणा-२५.६-२६८-८२.०९-९२८
अकोला -१८.२-३२१-८७.५५-९४२
वाशिम-१२.०-२४४-८१.७०-९२६
अमरावती-२८.९-२३७-८८.२७-९४७
यवतमाळ-२७.८-२०४-८०.७०-९४७
वर्धा -१३.०-२०५-८७.२२-९४६
नागपूर -४६.५-४७०-८९.२२-९४८
भंडारा -१२.०-२९३-८५.१४-९८४
गोंदिया-१३.२-२५३-८५.४४ -९९६
चंद्रपूर-२१.९-१९२-८१.३५-९५९
गडचिरोली-१०.७-७४-७०.५५-९७५
महाराष्ट्र -११,२३,७२,९७२ -३६५-८२.९१-९२५

8 टिप्पणी(ण्या):

  1. महाराष्ट्रात 1000 पुरुषांच्या मागे कीती महीला अाहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गावनिहाय लोकसंख्या त्यामध्ये गावनिहाय कुटुंब संख्या एकूण लोकसंख्या

    उत्तर द्याहटवा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.