मानव संसाधन विकास


* व्यक्तीकडे शिक्षण प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. याचाच अर्थ मानवी संसाधनाचा पहिला घटक शिक्षण हा आहे.

* दुसरे म्हणजे त्या व्यक्तीकडे आरोग्य असणे आवश्यक आहे. जर ती व्यक्ती आजारी असेल तर आपल्या क्षमतांचा वापरच करू शकणार नाही. यामुळेच मानवी संसाधनाचा दुसरा घटक आरोग्य सुविधा आहे.

* वाचन, लेखन, गणित यांना ३R म्हणतात.


मानवी संसाधन विकास - नियोजन आणि महत्त्व
* उत्पादनातील वाढ - साधनसंपत्तीच्या सुयोग्य वापरावर उत्पादनातील वाढ अवलंबून असते. शिक्षण आरोग्य व तंत्र यांच्या सहाय्याने कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू निर्माण करणे शक्य होते. उत्पादनातील अपव्यय टाळता येईल. सातत्यपूर्ण काम केल्याने कौशल्य यांच्यातही वाढ होते आणि याचे फायदे उत्पादनातील वाढीने मिळतात.

* उत्पादकता वाढ - मानवी संसाधनाच्या विकासाने उत्पादकतेत लक्षणीय प्रमाणात वाढ होते. जर कामगार शिक्षित, प्रशिक्षित व आरोग्य संपन्न असतील तर उत्पादकतेत वाढ होते. नवतंत्रज्ञानाचा स्विकार सर्व स्तरांवर होण्यास सुशिक्षित व प्रशिक्षित कामगार उपयुक्त वाढते.

* बचत दरात वाढ - प्रगतीसाठी भांडवल संचय, भांडवल गुतंवणूक आवश्यक असते. पण त्यासाठी बचतीची आवश्यकता असते. हि बचत वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढते. जेवढ्या प्रमाणात साक्षरतेचा स्तर अधिक असेल तेवढ्या प्रमाणात बचत करण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणजेच केलेली बचत चैनीच्या किंवा दिखावू उपभोगाची गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती वाढते. उप्भोगावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी कुटुंबातील संख्यादेखील मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होतो. त्याचाही अनुकूल परिणाम बचतीवर होतो.

* आयुर्मान वाढ - मानवी संसाधन विकासाचा दर्शक म्हणून अपेक्षित आयुर्मान पाहिले जाते. जर अपेक्षित आयुर्मान कमी असेल तर त्याचा अर्थ  व्यक्ती आपले उत्पादक योगदान पुरेशा प्रमाणात देत नाही. अपेक्षित आयुर्मान ४० असेल तर ती व्यक्ती आपल्या कामाचा कालावधी ६० वर्षे पूर्ण करण्याअगोदरच निघून जाते. हे राष्ट्राचे नुकसान वाढीव आयुर्मानाबरोबर घटते. आरोग्य  शिक्षण यांचा एकत्रित परिणाम म्हणून आयुर्मानात वाढ होतो.

* दरडोई उत्पन्न वाढ - मानवी संसाधन विकासाचा परिणाम दरडोई उत्पन्नावर होतो. शिक्षणाचा स्तर आणि आरोग्य यातील सुधारणामुळे उत्पादकता आणि उत्पादन वाढते तर दुसऱ्या बाजूला जननदर कमी होण्यास मदत होते. याचा एकत्रित परिणाम म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होते. उत्पादन कार्यात स्त्रियांचा वाढता सहभाग यामुळेदेखील दरडोई उत्पन्नवाढीस चालना मिळते. लोकांच्या दृष्टिकोनातील बदल हाही एक महत्वाचा बदल उत्पन्नवाढीस उपयुक्त ठरतो.

* आधुनिक समाज - पारंपारिक, अंधश्रद्धा, नाकारात्मक, निराशावादी समाजाचे आधुनिक शास्त्रीय दृष्टीकोन व सकारात्मक

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.