शाश्वत विकास

शाश्वत विकास

* मानवी विकास व पर्यावरण यांचा अतूट संबंध आहे. पर्यावरणाचे नैसर्गिक संतुलन राखण्याकरिता मानवाच्या क्रियाकर्मात अशा पद्धतीने बदल करणे गरजेचे आहे.

* ज्याद्वारे पर्यावरणाचा घटकाचा कमीत कमी ऱ्हास होऊन मानवी विकास साधला जाईल. अशा विकासाला शाश्वत विकास म्हटल्या जाते.

* भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याची पर्यावरणाची क्षमता कायम ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास न करता वर्तमान पिढीच्या सर्व गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय.

* शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय व नैसर्गिक खतांचा वापर करणे. त्याद्वारे जमिनिची पोषण क्षमता कायम राखली जाईल.

* पवन, सौर, जल, जैविक उर्जा यासारख्या अक्षय उर्जा साधनांचा उपयोग करून उर्जा संवर्धन करणे.


शाश्वत विकासाची क्षेत्रे
* शाश्वत उर्जा - क्षय उर्जा यांचे साठे २४०-७५ अब्ज टन असून दरवर्षी सुमारे ४०० दशलक्ष टन कोळसा वापरला जातो.  याच प्रमाणात जर कोळसा वापरला तर १५० वर्षापर्यंत साठे पुरतील. म्हणून उर्जा साधने जशी सौर, पवन, जलीय, लाटा, व जैविक पूर्ततेसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करावा लागतो.

* शाश्वत हवा - सजीवांच्या अस्तित्वाकरिता हवेची अत्यंत गरज आहे. वातावरणाच्या हवेच्या घटकाचे यांचे प्रमाण निच्शित असते. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे.

* लोकसंख्या - जागतिक लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पहिल्या शतकात लोकसंख्या २५ कोटी होती. ती आता वाढत ६१३ कोटी एवढी झाली आहे.


शाश्वत विकासात विचारांचे आव्हान
* सामाजिक विचार - समाजाला जेव्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते तेव्हा चिपकोसारख्या चळवळीची जन्म होतो. १७३१ मध्ये चिपको चळवळ सुरु झाली. अशा प्रकारची वैचारिक सामाजिक विचार असतात.

* राजकीय विचार - प्रत्येक देशात विविध राजकीय प्रणाली कार्य करीत आहेत. प्रत्येक राजकीय प्रणालीची तत्वे समाज विकास व निसर्ग कल्याणाशी निगडीत आहेत.

* आर्थिक विचार - शाश्वत विकास आर्थिक विकासावर आधारित आहे. आर्थिक विकास साधताना नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होता कामा नये. मानवाच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत आर्थिक विकास आवश्यक आहे.


इथेनॉलचे महत्व
* इथेनॉल उसापासून, मका व इतर जट्रोफासारख्या तेलबियांपासून निर्माण करता येते. भारतात उसापासून इथेनॉलनिर्मितीला खूपच वाव आहे.

* शिवाय इथेनॉल पेट्रोलिअम इंधनाला उत्तम पर्याय आहे. पेट्रोल आयातीवर भारताला दरवर्षी अब्जो रुपये खर्च करावे लागतात.

* केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना ५% इथेनॉल पेट्रोलमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* ब्राझील उसापासून इथेनॉल तयार करतो व ते पेट्रोलपेक्षा ५०% पेक्षा स्वस्त असते. त्यामुळे तेथे १० पैकी ८ गाड्या इथेनॉलवर चालतात.

* जगात ब्राझीलनंतर भारताचा उस उत्पादनात क्रम लागतो. अमेरिकेत मक्यापासून इथेनॉल निर्मिती होते. सरकार उत्पादकांना ५०% सवलत देते.


शाश्वत विकासात समाजाचा सहभाग
* प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावावे, व त्याचे संगोपन करावे. पाण्याचा वापर गरजेपुरता करा.
* आपापल्या घरात काटकसरीने वीज वापरा, सौर उर्ज, पवन उर्जेचा उपयोग करा.
* घरातील केरकचरा योग्य ठिकाणी टाका, ध्वनिप्रदूषण टाळा.
* कागदांचा वापर काटकसरीने करा, रद्दी जाळू नका.
* गरजेइतका पेट्रोलडीझेल वाहन चालवा. सायकलचा वापर जास्त करा.
* घरातील जैविक कचरा न फेकता त्याचे सेंद्रिय खत तयार करा.
* नदी, तलाव, किंवा व इतर वनक्षेत्रात गुरे धुवू नका, रस्त्याच्या कडेला शौचास जावू नका.


चिपको आंदोलन
* राजस्थानमधील जोधपुरच्या खेजरिली गावातील अमृतादेवी यांनी सन [१९३१] मध्ये स्थानिक राज्याच्या विरोधात चिपको आंदोलन चालू केले.

* राजाला राजवाडा बांधण्याकरिता, चुनाभट्टीमध्ये जळण्याकरिता लाकडांची गरज होती. राजाच्या सैनिकांनी खेजरी वृक्षांची तोड करण्यास सुरवात केली.

* तर गावातील अमृतादेवी व त्यांचे पती व मुले यांनी बिष्णोई समाजाच्या ३६० स्त्री पुरुषांनी खेजरी झाडांना कवटाळले व सैनिकांना झाडे तोडण्यास पतीबंध केला.

* उत्तर प्रदेशातील टेहरी गढवाल प्रदेशात सन १९७२ मध्ये [सुंदरलाल बहुगुणा] यांच्या नेतृत्वाखाली चिपको जंगलतोड करण्यात आले.

* प्रसिद्ध अमेरिकन तत्वज्ञ [ केवळ मानवास किंवा प्राण्यांनाच नैतिक व वैधानिक हक्क असावेत असे नाही तर वृक्ष, नद्या, पर्वत व सागर यानाही अस्तित्वाचा नैतिक हक्क असावा.]


शाश्वत शेती स्वरूप
* कृष म्हणजे नांगरणे, या धातूपासून कृषी हा शब्द बनला आहे. जमीन नांगरून तिच्यात बी पेरणे, त्याच्या रोपाची काळजी घेणे व त्यापासून उत्पादन मिळविणे म्हणजे कृषी होय.

* जगातील कृषीची कल्पना प्रथमता स्त्री वर्गाने प्रतिपादन केली आहे. शाश्वत शेती प्रामुख्याने पर्यावरण व त्याच्या घटकांचा समतोल कायम ठेवून अधिक उत्तम कृषी उत्पादन व पर्यावरण संरक्षण यांचा समावेश होतो.

* पर्यावरणाचा समतोल राखणे, चिरकाल शेती उत्पादनात वाढ करणे, नैसर्गिक साधनसंपत्ती व परिस्थितीचे जतन करणे.

* नैसर्गिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करणे, मृदा प्रदूषण टाळणे, नैसर्गिक पर्यावरण व सांस्कृतिक पर्यावरणावर शेतीपद्धती पिकपद्धती यांच्यात बदल करणे.

* शाश्वत शेतीपद्धतीत  जल, मृदा, प्राणी, वन, पर्यावरण यांचे संवर्धन करणे. अमर्याद मृदा वापर, रासायनिक खते कीटकनाशके, यांचा वापर टाळावा, त्याऐवजी नैसर्गिक खते, कीटकनाशके यांचा वापर करावा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.