भारताचे हवामान

भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून ' मोसमी हवामान ' हे येथील वैशिष्ट आहे.

भारतात उन्हाळा, पावसाळा, व हिवाळा हे तीन ऋतू आहेत.

उन्हाळा सर्वसाधारणपणे मार्च ते जून या कालावधीत असतो. किनारी भाग आणि उंचावरील पर्वतमय प्रदेश सोडल्यास या काळात भरपूर सर्व ठिकाणी तापमान उच्च पातळीवर असते. उत्तर आणि मध्य भारतातील बऱ्याच मोठ्या प्रदेशात दिवसातील सर्वोच्च तापमान ४०' सें पेक्षा जास्त असते. या काळात उत्तर भारतात उष्ण वारे वाहतात. त्यांना लू वारे असे स्थानिक नाव आहे.

भारतात मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. हे वारे हिंदी महासागरावरून वाहत येतात.या वाऱ्याचे आगमन दक्षिण भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. हळूहळू हे वारे पुढे सरकू लागतात. पंजाब हरियानात पोहोचण्यास या वाऱ्याना जुलैचा पहिला आठवडा उजाडतो. या वाऱ्यापासून मिळणारा पाऊस अनियमित असून भरवशाचा नाही. पश्चिम घाट प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांत भरपूर म्हणजे २०० से मी पाऊस पडतो. सामान्यता जून ते सप्टेंबर हे पावसाळी महिने समजले जातात. तामिळनाडू व दक्षिण आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी मात्र ईशान्य मोसमी वाऱ्यापासून नोवेम्बर आणि डिसेंबर या महिन्यातही पाऊस पडतो.

हिवाळा साधारणपणे नोवेंबर ते फेब्रुवारी या काळात असतो. त्यातल्या त्यात जानेवारी महिना सर्वात थंडीचा असतो. या काळात हिमालयात अनेक ठिकाणी तापमान ०' सें पेक्षा कमी असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.