डॉ भिमराव रामजी आंबेडकर


जीवन परिचय - शिक्षण
डॉ बाबासाहेब आंबेडकरचा जन्म मध्य प्रदेशातील महु या गावी १४ एप्रिल १८८९ रोजी झाला.

महाराष्ट्रातील  जिल्ह्यातील  दापोली  तालुक्यातील आंबावडे हे भिमरावाचे मूळ गाव आहे. वडील रामजी मालोजी सपकाळ व आई भीमाबाई.  त्यांचे मूळ आडनाव सपकाळ होते. पण मूळ गाव आंबवडे असल्यामुळे सपकाळ हे नाव मागे पडून आंबेडकर झाले.

आंबेडकरांचे शिक्षण साताऱ्यामध्य झाले. १९०७ मध्ये मुंबई एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये म्याट्रिकची परिक्षा महार जातीतील पहिले म्याट्रिकची परीक्षा पास होणारे विद्यार्थी. १९१२ मध्ये ते बी ए ची परीक्षा पास झाले. वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी बडोदा सरकारच्या विभागात लेफ्टनट म्हणून नोकरी पत्करली. १०१३ ते १९१६ या तीन वर्षात सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागले. प्राचीन भारतावर निबंध लिहून एम ए ची पदवी संपादन केली. कोलंबिया विद्यापीठाने पि एच डी ही सर्वोच्च पदवी प्रदान केली.

सामाजिक कार्य
* महाडचा सत्याग्रह - अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा  साधा अधिकार नव्हता. ४ ऑगष्ट १९२३ रोजी ब्राम्हणेतर पक्षाचे नेते सी के बोले यांनी मुंबई प्रांताच्या       विधीमंडळात एक ठराव पास केला.१९ व २० मार्च रोजी महाड येथे कुलाबा परिषद आयोजीत केली. २० मार्च १९२७ रोजी परिषदेतील सर्वांनी आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवला. व तो       खुला केला.

* मनुस्मृतीचे दहन- मानुस्मुती या धर्मग्रंथाची डॉ २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन केले.

* पंजाबराव देशमुख यांच्या मदतीने अमरावतीचे अंबा मंदिर खुले केले. १३ ओक्टोंबर १९२७ रोजी पार्वती मंदिर  खुले केले. ३ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर अस्पुश्यासाठी खुले केले.

पुणे करार - महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात २३ सप्टेंबर १९३२ रोजी एक समझोता घडून आला त्यालाच पुणे करार असे महणतात.
पुणे करारातील कलमे 
बाबा साहेब आंबेडकरनी अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदार संघाचा अस्विकार करावा.  हरीजनासाठी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या.केंद्रात १८%जागा राखीव ठेवण्यात आल्या.

१७ सप्टेंबर १९३७ रोजी मुंबई विधानसभेत महाराजांच्या वंशपरंपरागत हुद्यासाठी विधेयक सदर केले.

१४ ओक्टोंबर १९३६ रोजी नागपूर येथे आंबेडकर यांनी बोद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला यासाठीच १५ १९३६ रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. जनता हे या पक्षाचे मुखपत्र होते.
१९४२ मध्ये  हा पक्ष विसर्जित करून अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली.

शैक्षणिक कार्य 
संघटीत व्हा, संघर्ष करा  हा त्यांचा संदेश होता.

१९४५ मध्ये मुंबई येथे पीपल्स एजुकेशन सोसायटीची  स्थापना केली.

१९४६ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज तर १९५० मध्ये ओरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरु केले.

१९५८ साली औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. त्याला बाबासाहेबाचे नाव देण्यात आले. अस्पुरश्यता निवारण परिषदा. २१ व २२ मार्च १९२० रोजी कागल येथे माणगाव येथे सभा करण्यात आली. १ जून दरम्यान नागपूरला अखिल भारतीय बहिशकृत समाज परिषद भरविण्यात आली. २७ ऑक्तो १९५१ रोजी हिंदू कोड बिलाला विरोध झाला.

आंबेडकरांनी थॉटस ऑन पाकिस्तान हा प्रबंध लिहिला


आंबेडकरांचे वृत्तपत्र
मूकनायक-१९२०
बहिष्ककृत भारत- १९२७
समता- १९२८
जनता - १९३०

६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकरांचे निधन झाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.