महाराष्ट्रातील जलसिंचन

महाराष्ट्रातील जलसिंचन
महाराष्ट्राचे जलसिंचन जास्तीत जास्त किंवा कमाल सिंचन क्षमता सुमारे ७१ लाख हेक्टर समजली जाते. जलसंपत्तीचा वाटा ५३ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या कमाल सुमारे २ कोटी हेक्टर पैकी फक्त ७१ लाख हेक्टर जमिनीलाच पाणीपुरवठा होऊ शकेल. एकूण शेतजमिनी पैकी जलसिंचानाचे प्रमाण फक्त २६% असेल.

महाराष्ट्रात जलसिंचन प्रकारानुसार प्रमुख जिल्हे जलसिंचन प्रकार-जिल्हे
विहीर जलसिंचन-अहमदनगर,नाशिक,पुणे.
तलाव जलसिंचन -भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली
ठिबक जलसिंचन-नाशिक,अहमदनगर,औरंगाबाद,अमरावती,जळगाव.
तुषार जलसिंचन-जळगाव,अमरावती,बुलढाणा

महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजना
* पुणे विभाग - [पुणे - माणिकडोह, वाडज, डिंबे वरसगाव, पानशेत, खडकवासला, वीर,][सातारा - धोम, कन्हेर, कोयना,][कोल्हापूर - तुळशी, राधानगरी,][सोलापर - उजनी]

* नाशिक विभाग - [नाशिक - वाघाड, आळंदी, ओझरखेड, पालखेड, गंगापूर, गिरणा.][अहमदनगर - भंडारदरा, ओझर, मुळा, कुकडी,][जळगाव - दहीगाव, जमना]

* औरंगाबाद विभाग - [औरंगाबाद - जायकवाडी][बिड - माजलगाव][परभणी हिंगोली - येलदरी, सिद्धेश्वरी पूर्णा,][नांदेड - मन्याड, विष्णुपुरी][उस्मानाबाद - मांजरा,]

* अमरावती विभाग - [अमरावती - अप्पर वर्धा, शहानुर,][अकोला वाशिम  - वान, पोपटखेड,महान,अडान][बुलढाणा - जयगाव, नळगंगा, हतनूर, जिगाव, खडकपूर्णा]

* नागपूर विभाग -  [नागपूर - रामटेक, लोवर वेण्णा, पेंच] [वर्धा - अप्पर वर्धा, लोवर वर्धा,] [भंडारा गोंदिया - बाघ, इटियाडोह, भवानथडी, घोसी,][चंद्रपूर - असोला मेंढा, हुमण,][गडचिरोली - तुलतुली, बाती]

* कोकण विभाग - [ठाणे - भातसा, सूर्या,वैतरणा,]


महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती
महाराष्ट्रात ३० जून २०११ रोजी पूर्ण मोठ्या प्रकल्पाची संख्या ३२ वर आहे. तर प्रगतीपथावर ५४ मोठे प्रकल्प आहेत.मध्यम १८६ प्रकल्प असून ७२ मध्यम प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. राज्य स्तरावरील पूर्ण लघु प्रकल्प २५४९ असून प्रगतीपथावर ५५९ लघु प्रकल्प आहेत. स्थानिक पातळीवरील एकूण लघु प्रकल्प ६३,१४५ तर प्रगतीपथावरील लघु प्रकल्पाची संख्या ६६८१ एवढी आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.