बॉम्बस्फोट आपत्ती

बॉम्बचे प्रकार
* आगलावे बॉम्ब - सामान्यपणे १ किलो वजनापासून ते ५० किमी वजनापर्यंत हे बॉम्ब आग लावण्यासाठी उपयोगात आणले जातात.
* बहुकामी बॉम्ब - बहुकामी बॉम्ब लोखंडी बॉम्ब या नावानेसुद्धा प्रचारात आहे. युद्ध कार्यामध्ये या प्रकारच्या बॉम्बचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
* खंदक बॉम्ब - ब्लॉक बस्टर स्वरूपाच्या या बॉम्बचा कोष किंवा आवरण अतिशय पातळ असते. बॉम्बची भेदनशक्ती किरकोळ असून प्रभंजन शक्ती अधिक असते.
* नुट्रोन बॉम्ब - अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात नागासाकी आणि हिरोशिमा या दोन शहरावर बॉम्ब टाकून युद्ध संपुष्टात आणले. युद्ध संपुष्टात आणून दोन्ही शहरे खाक झाली. या बॉम्बची कल्पना टेलर या महाशयांना सुचली आणि त्यांनी हा बॉम्ब तयार केला.
* हायड्रोजन बॉम्ब - हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटाचे कार्य तीन टप्प्यात पूर्ण होते. सुरवातीला अनुकेंद्र विच्छेदन होते. त्यानंतर दोन अनुकेंद्रकाचे सम्मिलन होते. व पुन्हा अनुकेंद्राचे विच्छेदन होऊन स्फोटाची प्रक्रिया पूर्ण होते.


मुंबई बॉम्बहल्ला १९९३
* १९९३ साली लागोपाठ १३ बॉम्बहल्ल्यांनी मुंबईला धक्का देण्याचा प्रकार दहशतवाद्याकडून झाला. १२ मार्च १९९३ शुक्रवार रोजी अत्यंत स्फोटक व शक्तिशाली बॉम्बस्फोटाची मालिका मुंबईवर कोसलळी.
* १२ मार्च १९९३ दुपारी १.३० ते ३.४० दरम्यान हॉटेल्स बँका, इत्यादीवर बॉम्ब हल्ला करण्यात आला.
* भूमिगत गुन्हेगारातील जगातील डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाउद इब्राहीमच्या मदतीने मुंबईत बॉम्ब हल्ले करण्यात आले.
* स्मगलर अस्लम भट्टी व दाउद यांनी आपला साथीदार टायगर मेनमनच्या कार्यातून बॉम्बस्फोट घडवून आणले.
* या हल्ल्यात २५७ जण मृत्यूमुखी पडले, तसेच ७१३ झण जखमी झाले, यात वित्तहानी व प्राणहानी मोठ्या प्रमाणत झाली.
* या बॉम्ब हल्ल्यामागे हिंदू व मुस्लिम यांच्यातील संघर्ष, बाबरी मशीद हि प्रमुख कारणे असल्याने मुस्लिम व्यापारी यांच्या व्यवसायावर व इमारतीवर हल्ले चढवण्यात आले.


हरित रसायनशास्त्र
* जगामध्ये भौतिक सुखासाठी अनेक प्रयोग केलेले आहे. आपले आरोग्य आणि दैनदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निरनिराळे संशोधन झालेले आहे.
* आज मानवाला सुंदर, प्रदूषण विरहीत वातावरणाची आवश्यकता जाणवू लागली आहे. शुद्ध हवा, निर्जंतुक पाणी आणि ताजे अन्न या अलीकडच्या मानवी गरजा आहेत.
* त्यासाठी हरित रसायनशास्त्र म्हणजे मानवाची प्रतिकार शक्ती व तेजस्वीपणा वाढविणारे शास्त्र आहे. तसेच मानवाला दिर्घायुष्याकडे पोहोचविण्याचा महामार्ग आहे.
* नैसर्गिकरित्या विघटन होणार्या पदार्थाची निर्मिती करणे, अभिक्रिया कारक, आणि उत्पादित घटक यामधील मध्यस्त घटक दूर करणे.
* रासायनिक अभिक्रियांचा आराखडा तयार करताना उत्पादित पदार्थाचे अन्य घटक रासायनिक पदार्थामध्ये रुपांतर होणार नाही याची काळजी घेणे.
* पृथकरण पद्धतीमध्ये सुधारणा करणे, त्यासाठी नवीन उपकरणे उपयोगात आणणे. नैसर्गिक उत्प्रेरकाचा उपयोग करणे.
* नैसर्गिक उत्प्रेराकाचा उपयोग करणे म्हणजे उत्पादनात निरनिराळी वनस्पतीची पाने, फुले, फळे, मुळाचा रस, बुरशी, शेवाळ, कवक, खडक, व गाळ यांच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रियांची गती वाढविणे.
* विषारी रसायनांचा उपयोग टाळावा, रासायनिक क्रियेमध्ये आवशक्यता असेल तरच उष्णतेचा उपयोग करणे.
* द्रावकमुक्त रासायनिक अभिक्रियांचा उपयोग करणे, रासायनिक अभिक्रियांची मांडणी करताना जास्तीत जास्त अभिक्रिया कारकांचे रुपांतर उत्पादनामध्ये होईल अशी व्यवस्था करणे.
* कच्या मालाचा पुन्हा पुन्हा उपयोग करणे, टाकावू पदार्थाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.