भारत : थोर व्यक्ती परिचय

अनिल काकोडकर (१९४३)

भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक. सध्या अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष. भारताच्या पहिल्या व दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीत महत्वाची कामगिरी. भारत अमेरिका अणु करार चर्चेत महत्वाचा सहभाग.


अटलबिहारी वाजपेयी (१९२६)
राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे कार्यकर्ते व जुन्या जनसंघाचे ज्येष्ठ नेते. लोकसभेचे दीर्घकाळ सद्यस्य. भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष. लोकप्रिय वक्ते व संसदपटू. युनोच्या आमसभेत पहिल्यांदा राष्ट्रभाषेतून हिंदीतून भाषण करणारे पहिले परराष्ट्र मंत्री १९७७ ते ७९ त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान १९९८ ते मे २००४ पर्यंत.


अरुणा आसफअली (१९०९-९६)
स्वतंत्र चळवळीतील भारत छोडो आंदोलनात सहभाग. भारतरत्न मरणोत्तर १९९७ पुरस्काराने सन्मानित.


अझीम हाशम प्रेमजी - १९४५
माहिती तंत्रज्ञानातील उद्योगातील 'विप्रो टेकनॉजीचे' समूहाचे प्रमुख. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त 


इंदिरा गांधी (१९१९-१९८४)
काँग्रेस अध्यक्ष्या राहिल्या. भारताच्या पंतप्रधान १९६६ ते १९७७ व १९८० ते १९८४ पंतप्रधानाच्या काही महत्वाच्या घटना, भारताची पहिली अणुचाचणी, पहिला उपग्रह याचे उड्डाण व भारत पाकिस्तान युद्ध यशस्वी करण्यात यश. सिक्कीमचे भारतात विलीनीकरण. भारतरत्न १९७१ मध्ये सन्मानित. १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी लावण्यात त्यांचा सहभाग. पंजाबमधील दहशदवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिर लष्करी कारवाई.'ऑपरेशन ब्लू स्टार' करून मुक्त केले. या घटनेच्या संदर्भात ३१ ऑक्टोम्बर १९८४ ला त्यांची शीख अंगरक्षकाकडून हत्या झाली.


ई व्ही रामस्वामी नायकर उर्फ (पेरियार) १८७९-१९७३
तामिळनाडू राज्यात ब्राम्हणाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठीच्या सामाजिक चळवळीचे अग्रगण्य नेते. उत्तर भारत, हिंदी भाषा यांच्या वर्चस्वाला विरोध. चळवळीतील वाटचालीच्या एका टप्प्यावर त्यांनी द्रविड राष्ट्रवाद व द्रविडीस्थान यांचा पुरस्कार केला. संपूर्ण बुद्धिवादी व निरीश्वरवादी जीवन वृत्तीचे पुरस्कर्ते.


उस्ताद बिस्मिल्ला खान १९१६-२००६
भारतातील सर्वश्रेष्ठ सनईवादक, अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती, पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित. संगीत नाटक अकादमी व रॉयल नेपाळ आर्ट अकादमी तर्फे सन्मानित. देशात व परदेशात लोकप्रिय भारतरत्न २००१ मध्ये सन्मानित.


फिल्ड मार्शल करिअप्पा (१९००-१९९३)
पहिले भारतीय सरसेनापती १९४९ ते १९५३ फिल्ड मार्शल या पदाने सन्मानित. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मध्ये भारताचे उच्चायुक्त.


किरण बेदी (१९४९) (इंडियन पोलीस सर्व्हिस)
IPS मध्ये झालेली पहिली भारतीय स्त्री व दिल्लीच्या तिहार तुरुंगामधील कैद्यांमध्ये विधायक काम व त्यांच्या उन्नतीचे प्रयत्न. १९९४ मध्ये मगसेसे पुरस्काराने सन्मानित.


वर्गीझ कुरियन (१९२२-२०१२)
गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टीकोनातून चालवलेल्या दुग्धविकास प्रकल्पाचे शिल्पकार. दुध उत्पादनात भारताला जगात अग्रस्थानी नेणाऱ्या 'ऑपरेशन फ्लड १ व २' या मोहिमांचे प्रवर्तक. राष्ट्रीय डेअरी बोर्डाचे चेअरमन. १९६३ ला 'मगसेसे पुरस्कार'. १९८९ ला 'वर्ल्ड फूड प्राईस' पुरस्कार. १९९९ ला पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित.


गिजुभाई बधेका (१८८५-१९३९)
भारतातील बालशिक्षणाचे अद्याप्रवार्तक. त्यांनी मोंटेसरी पद्धतीने शिक्षण देणारी 'बालमंदिर' ही संस्था काढली. भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक. मुले व पालक यांच्यासाठी अनेक पुस्तकांचे लेखन. 'शिक्षण पत्रिका' या गुजराथी मासिकांचे संस्थापक.


चक्रवर्ती राजगोपालाचारी (१८७९-१९७२)
स्वातंत्र्यालढ्यात सहभाग. मद्रास राज्याचे मुख्यमंत्री. भारताचे पहिले भारतीय गवर्नर-जनरल. जवाहरलाल नेहरूच्या समाजवादी धोरणाचे व त्यातून उदयास आलेल्या ' लायसन्स परमिट राज ' चे कठोर व द्रष्टे टीकाकार मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या स्वतंत्र पक्षा चे संस्थापक. १९५४ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.


डॉ ए पी जे अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
भारतीय क्षेपणास्त्र  कार्यक्रमाचे जनक. पृथ्वी, नाग, इत्यादी क्षेपणास्त्राचे निर्मितीत मोलाचे योगदान. १९९० ला पद्मविभूषण, १९९८ ला भारतरत्न, या पुरस्कारांनी सन्मानित. २००२ साली भारताच्या राष्ट्रपती पदावर नियुक्ती.


डॉ जयंत विष्णू नारळीकर (१९३३)
जेष्ठ गणिती व खगोलीय भौतिकी शास्त्रज्ञ. केंब्रीज विद्यापीठ व TIFR या संस्थेतून संशोधन. शांती-स्वरूप भटनागर पुरस्कार, आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलिंग पुरस्कार, अडम्स पारितोषिक, पद्मभूषण, फाय फाउंडेशन पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, या पुरस्कारांनी सन्मानित.


डॉ विजय भटकर (१९४६)
सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ advanced computing अर्थात 'C-DAC'  पुणे या संस्थेचे संस्थापक. परम या महासंगणकाचे निर्माते. परम १०००० हा महासंगणक प्रकल्प चालू. सामान्य माणसाला माहिती तंत्रज्ञान उपलब्द व्हावे यासाठी प्रयत्नशील.


जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य (१९२६-१९८६)
१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात महावीर चक्र या पुरस्काराने सन्मानित, १९८३ ते १९८६ या कालखंडात भारतीय लष्कराचे सरसेनापती, यांच्या कारकिर्दीत अमृतसरचे सुवर्ण मंदिर अतिरेक्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार हि मोहीम यशस्वी करण्यात आली. निवृत्ती नंतर पुण्यात शीख अतिरेक्याकडून हत्या


जे आर डी टाटा (१९०४-१९९३)
टाटा उद्योगाचे अध्यक्ष व संस्थापक, कराची - मुंबई पहिली हवाई सेवा देणाऱ्या विमानाचे व भारतीय विमानसेवेचे प्रवर्तक, १९९२ भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.


टी. एन. शेषन (१९३२)
IAS मधील जेष्ठ अधिकारी, १९९० मध्ये मुख्य निर्वाचन आयुक्त म्हनून अत्यंत मोलाचे काम. घटनादत्त अधिकारांचा निर्भयपणे वापर करून त्यांनी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला शिस्त, वळण, लावले व सुधारणा घडवून आणल्या. मगसेसे पुरस्काराने सन्मानित(१९९६).


मदर टेरेसा (१९१०-१९९७)
मूळ अल्बेनियन. १९४६ साली भारतात आगमन, समाजसेवेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार, समाजाने झिडकारलेल्या व असाध्य रोग्यांना पिडीत अशा लोकांत कार्य व सेवा. मिशनरीज ऑफ चारिटी या जगप्रसिद्ध संस्थेच्या शांततेसाठी नोबेल पुरस्कार १९७९, व १९८० साली भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित.


मोरारजी देसाई (१८९६-१९९५)
भारतातील स्वतंत्र आंदोलनात भाग, मुंबई राज्याचे मुख्यमंत्री १९५२-५६, केंद्रीय अर्थमंत्री १९५६-६३, अर्थमंत्री व उपपंतप्रधान १९६७-६९, आणीबाणी कालखंडात कारावास १९७५-१९७७, जनता पक्षाच्या शासनात पंतप्रधान १९७७-१९७९, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित १९९१.


मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२)
भारतातील एक अत्यंत कर्तुत्ववान अभियंता. धरणबांधणी क्षेत्रात मोलाचे योगदान. (खडकवासला धरण म्हैसूर कृष्ण्सागर राजसागर) भारताच्या योजनाबद्ध आर्थिक विकासाचे आरंभीचे पुरस्कर्ते. भारतरत्न १९५५ पुरस्काराने सन्मानित.


पंडित रविशंकर (१९२०-२०१२)
श्रेष्ठ भारतीय सतारवादक. पश्चिमात्य देशात सतार या वाद्याला लोकप्रियता मिळवून दिली. प्रसिद्ध व्हायोलीन वादक येहुदी मेनूहीन बिटल गायक जॉर्ज हरीसन या जगविख्यात कलावंताना रविशंकर यांच्या चाह्त्यात समावेश. १९९९ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.


राजीव गांधी (१९४३-१९९१)
स्वतंत्र भारताचे १९८४ ते १९८९ दरम्यान पंतप्रधान. श्रीलंका व मालदिव बेटामधील लष्करी हस्तक्षेप तसेच पंजाब व आसाम समझोते या यांच्या कारकिर्दीतील ठळक घटना. भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते. श्रीलंकेतील तमिळ दहशतवाद्याकडून त्यांची हत्या झाली. भारतरत्न १९९१ पुरस्काराने सन्मानित.


सरदार वल्लभभाई पटेल (१८५७-१९५०)
गुजरात राज्यतील खेडा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाचे व स्वतंत्र आंदोलनचे थोर नेते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान. सुमारे ५०० देशी संस्थानाचे भारतात घडवून आणलेले विलीनीकरण व हैद्राबादच्या निजामाविरुद्ध पोलिस कारवाई करून हैदराबादचे भारतात घडवून आणलेले विलीनीकरण हि सरदारांची सर्वात मोलाची कामगिरी. पोलादी पुरुष म्हणून परिचित. भारतरत्न मरणोत्तर १९९१ पुरस्काराने सन्मानित, भारताचे बिस्मार्क.


सलीम अली (१८९६-१९८७)
भारताचे सर्वश्रेष्ठ पक्षीतज्ञ. बॉम्बे नचरल हिस्ट्री सोसायटी मध्ये कार्य. भारतीय पक्ष्यांच्या सखोल अभ्यासासाठी देशात मोहिमा काढल्या व ग्रंथलेखन केले. महत्वाचे ग्रंथ द बुक ऑफ इंडिअन बर्डस, हंडबूक ऑफ द बर्डस ऑफ इंडिया अंड पाकिस्तान. पॉल गेटी प्राईज, पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित. आत्मचरित्र - द फॉल ऑफ अ स्प्यारो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.