जागतिक आरोग्य संघटना

संघटनेचे स्वरूप
* जागतिक आरोग्य संघटनेची सभा २२ जुलै १९४६ रोजी आंतरराष्ट्रीय मंडळामार्फत न्यूयॉर्क या शहरात बोलविण्यात आली.

* जागतिक आरोग्य संघटना हि एक प्रतिनिधी संस्था म्हणून कार्य केले जातात. जागतिक संघटनेच्या घटनेनुसार आरोग्य म्हणजे फक्त रोग व दुर्बलता यांच्यापासून सुटका नसून अशी अवस्था कि, ज्यामध्ये व्यक्तीचे शारीरिक, मानसिक व सामाजिक कल्याण पूर्णपणे साधले जाते.

* स्वतंत्र संघटनात्मक रचना म्हणून ७ एप्रिल १९४८ रोजी त्यास २६ देशांच्या सदस्यांनी मान्यता दिली.

* म्हणून ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो.


जागतिक आरोग्य संघटनेचे सहा कार्यक्रम
* विकासाला मदत - दारिद्र्य नष्ट केल्याशिवाय आरोग्याचे उदिष्ट साध्य होणार नाही. दारिद्यामुळेच आरोग्य प्राप्त करता येत नाही. विकासाशिवाय दारिद्र्याचे निर्मुलन होणार नाही.

* आरोग्य सुरक्षा वाढविणे - जागतिकीकरण, नागरिकीकरण, व पर्यावरणाचा ऱ्हास यातून जागतिक आरोग्यविषयक असुरक्षितता वाढली आहे.

* आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण - आरोग्य सुविधा गरीब, संवेदनशील घटकापर्यंत पोहोचविणे हे आरोग्य यंत्रणेचे आव्हान आहे. स्त्रिया, लहान मुले, गरीब, हे सर्व आरोग्य व्यवस्थेचे घटक होतील यात समाविष्ट होतील.

* संशोधन माहितीचा वापर - आरोग्यविषयक माहिती व संशोधन हे धोरण कार्यक्रम ठरविण्यासाठी महत्वाचे घटक आहेत.

* सहभागात वाढ - जागतिक आरोग्य संघटना हि विविध संघटना, संस्था खाजगी क्षेत्र या सर्वांचे सहकार्य घेते.

* कार्य सुधारणा - आपले कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणामकारक ठरावे यासाठी जागतिक आरोग्य संघटना कर्मचारी व सदस्य सातत्याने प्रयत्न करीत राहतात.


आरोग्य संघटनेचे उदिष्टे व कार्ये
* भौतिक व सामाजिक बदलांचा परिणाम म्हणून निर्माण होणारे आरोग्यविषयक धोक्याचे प्रमाण घटविणे आणि आरोग्य संपन्न जीवनशैली विकसित करण्यास मदत करणे.

* विकासात्मक बाबीशी निगडीत आरोग्यविषयक प्रश्नावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशाच्या क्षमता वाढीस मदत करणे.
* विविध देशांच्या सहकार्यातून आरोग्यविषयक धोके निर्माण करणे.

* महत्वाच्या आरोग्यविषयक प्रश्नात नेतृत्व करणे व देणे व जेथे संयुक्त कृतीची आवश्यकता असते तेथे सहभाग देणे.

* आरोग्यविषयक संशोधन करणे, प्राप्त करणे व त्याची अंमलबजावणी करणे.

* देशांच्या संख्यात्मक व्यवस्था विकसीत करण्यास तांत्रिक सहाय्य करणे.

* आरोग्य स्थितीचे मूल्यमापन करणे.


जागतिक आरोग्य संघटनेची रचना
 * जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व सदस्य हे आरोग्य संसदेचे सद्य्स्य असतात.

* प्रत्येक सद्यस्य राष्ट्रात एक मत असते. पण ते ३ प्रतिनिधी पाठवू शकतात. हि संसद वर्षातून एक वेळा महिन्यातून भरते आणि ३ आठवडे चालेते.

* अध्यक्षांची निवड दरवर्षी केली जाते. आरोग्य संसद हि अंदाजपत्रक ठरविते. प्रशासन व धोरणाबाबत निर्णय घेते.

* निर्णय अथवा ठराव २३ बहुमताने घेतले जातात. व ते सदस्य देशाने १८ महिन्यात अमलात आणावयाचे असतात.

* संसदेच्या ठरावात आंतरराष्ट्रीय स्तरावर संसर्गजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी निकष तयार करणे.

* नव्या रोगांचे, आरोग्य पद्धतीचे निकष ठरविणे.

* आंतरराष्ट्रीय वापराच्या रोगनिदान पद्धतीचे निकष ठरविणे.

* औषधे व उपचारप्रणालीच्या जाहिरातीचे निकष ठरविणे.


कार्यकारी मंडळ
* आरोग्य संसदेमार्फत ३२ सदस्यांचे कार्यकारी मंडळ निवडले जाते. यामध्ये प्रतिनिधित्व सर्व देशांचे व्हावे अशी रचना असते. कार्यकारी मंडळाची मुदत ३ वर्षे असते.

* दरवर्षी १३ सदस्य बदलले जातात. प्रत्येक सदस्य हा आरोग्य क्षेत्रातील असणे आवश्यक आहे. दरवर्षी दोन वेळा त्यांची सभा होते.
सचिवालय,निधी, कर्मचारी, कार्यालये

* सचिवालयात एक महानिर्देशक व त्याचा कर्मचारी वर्ग असतो. प्रशासकिय व तांत्रिक कार्याची देखरेख करणे हे त्याचे कार्य असते.

* संचालक - डायरेक्टर जनरल हा कार्यकारी मंडळातून निवडला जातो.
* निधी - सदस्य राष्ट्रांच्या वर्गणीतून तसेच सहभागी देणगीतून जागतिक आरोग्य संघटनेस वित्तपुरवठा उपलब्द होतो. बिल आणि मेलिंडा गेट फाऊनडेशन या सदस्याची मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.

* कर्मचारी - जागतिक आरोग्य संघटनेचे दैनदिन कामकाज पाहण्यासाठी ८,५०० कर्मचारी आहेत. त्यात १४७ देशांचे प्रतिष्टीत राजदूत आहेत.


प्रादेशिक कार्यलये
* जागतिक आरोग्य संघटनेची सहा प्रादेशिक कार्यालये असून ती पुढीलप्रमाणे आहेत.
     
   देश        मुख्यालय
* आफ्रिका     ब्राजविले
* अमेरिका     वॉशिग्टन
*  इजिप्त         कैरो
*  युरोप         कोपेनहेगन
* भारत          दिल्ली
* फिलिपिन्स   मनिला


जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यक्रम
* वृद्ध लोकांना सहाय्य - संघटनेमार्फत सर्व विकसनशील देशामध्ये वृद्ध लोकांना मदत करण्यासाठी उपाय राबविले जात आहे.

* आरोग्य धोरण व व्यवस्था संशोधन करार - आरोग्य धोरण व व्यवस्था यामध्ये असणाऱ्या उनिवामुळे आरोग्य उदिष्टे साध्य करण्यात तसेच आरोग्य सुविधा पुरविण्यात अडचणी येतात.

* जैवकशास्त्रासंबधी औषधे व चाचणी संदर्भात मानके - औषधे व चाचणी संदर्भात काम या संघटनेपासून केले जाते.

* रक्तबदल सुरक्षा संघ - सघटनेमार्फत रक्त बदलतांना सुरक्षितता साध्य करण्यासाठी एका रक्तबदल सुरक्षा संघाची स्थापना केली गेली आहे.

* कर्करोग नियंत्रण कार्यक्रम - कर्करोग नियंत्रण कार्यक्रम हा जागतिक आरोग्य संघटनेचा कार्यक्रम असून कर्करोग हा सार्वत्रिक व भयंकर असा आजार अस्तित्वातील कर्करोग नियंत्रित कार्यक्रमाचे भक्कमिकरण करणे हे आहे.

* तीव्र श्वसन आजार कार्यक्रम - शेकडो दशलक्ष लोक दररोज श्वसनासंबंधी आजारामुळे त्रासले जातात.

* मधुमेह कार्यक्रम - मधुमेह हा तीव्र स्वरूपाचा आजार असून दरवर्षी जागतिक मृत्यूपैकी एकूण ५% मृत्यू हे मधुमेळामुळे होतात. मधुमेहापासून होणाऱ्या मृत्यूत पुढील १० वर्षांत जवळपास ५०% टक्यांनी वाढ होण्याची जागतिक शक्यता आहे.

* अपंगत्व व पुनर्वसन - सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम जे पुनर्वसनासाठी व अपंग लोकांना लागणारी सहाय्यभूत साधने तयार करण्यासाठी राबविले जाते.

* कुटुंब व समुदाय आरोग्य समूह -  याचे महत्वाचे कार्य व्यक्तीचे व कुटुंबाचे आरोग्य व विकास यावर सध्या व भविष्यात लक्ष ठेवणे हे आहे.

* तीव्र श्वसन आजाराविरोधी जागतिक करार करून या कराराचे २८ मार्च २००६ रोजी बीजिंग येथे झाले.

* जागतिक शाळा आरोग्य उपक्रम - हा उपक्रम १९९५ साली अस्तित्वात असून स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक व जागतिक पातळीवर आरोग्य व शिक्षणाच्या बाबतीतील कार्याचे बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

* कर्करोग संशोधन आरोग्य उपक्रम - मानवी कर्करोगावरील कारणावर संशोधन करून  नियंत्रित करण्यसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

* सार्वजनिक आरोग्यासाठी ज्ञान व्यवस्थापन - हे एक जागतिक जाळे असून याचे नेतृत्व जागतिक आरोग्य संघटनेकडून केले जात असून इतर प्रमुख प्रादेशिक राष्ट्रीय संस्थाना समावेश असतो.

* जागतिक हिवताप कार्यक्रम - याचे प्रमुख उदिष्ट हिवताप आजाराशी झुंझने हे आहे.

* व्यावसायिक आरोग्य - कामाच्या ठिकाणी होणारे अपघात व मृत्यूचे प्रमाण फार मोठे असून त्यामुळे होणारा त्रास ४ ते ५% आहे.

* क्षयरोगविरोधी भागीदारी - सन २००० मध्ये हि भागीदारी अस्तित्वात आली. हे उदिष्ट प्राप्त करून एकत्र काम करण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. दर्शविणाऱ्या जवळपास ५०० संस्थाचे जाळे असणारी हि भागीदारी आहे.

* पाणी, स्वच्छता, सुविधा आणि आरोग्य - ह्या सुविधा सुधारण्यासाठी हि संघटना कार्य करते.

3 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.