व्यावसायिक शिक्षण - मानवी संसाधनाचे साधन

व्यावसायिक शिक्षण - संकल्पना व स्वरूप
* व्यावसायिक शिक्षण म्हणजे कामगारांचे शिक्षण किंवा प्रशिक्षण होय.

* व्यावसायिक शिक्षण म्हणजे शारीरिक कष्टाच्या कामाचे शिक्षण होय.

* कौशल्यकेंद्रित शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण होय.

* सामाजिकदृष्ट्या उत्पादक ठरणारे शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण होय.


व्यावसायिक शिक्षणाची तत्वे
* व्यावसायिक शिक्षण जेथे दिले जाते तेथील वातावरण हे कामगार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जेथे कामावर जातो, तेथील वातावरणाप्रमाणे असावे. त्यामुळे प्रशिक्षण व वापर यातील अंतर किमान राहते.

* प्रशिक्षणाच्या ठिकाणी वापरली जाणारी साधने व यंत्रे आधुनिक असली पाहिजेत.

* प्रत्येकाच्या आवडी - निवडी, क्षमता व कल यानुसार प्रशिक्षण दिले पाहिजे.

* व्यावसायिक शिक्षण देणारा शिक्षक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. त्या उद्योग क्षेत्रातील बदलांचे पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे असले पाहिजे.

* श्रम बाजाराच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते बदल अभ्यासक्रमात केले पाहिजेत.

* प्रत्येक कार्यासाठी किमान कौशल्याची आवशक्यता असते. ती प्रथम पूर्ण करणे हे व्यावसायिक शिक्षणापासून साध्य झाले पाहिजे.

* व्यावसायिक शिक्षण लवचिक असले पाहिजे. बदलत्या कौशल्याची मागणी त्यातून पूर्ण होते.


व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाची सद्यस्थिती
* व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाकडे पाहण्याचा व्यक्तीचा व समाजाचा दृष्टीकोन हा अशा कौशल्याची मागणी ठरवीत असतो.

* पुढच्या शिक्षणाची तयारी यासाठी शिक्षण हे सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचे मुख्य सूत्र दिसते.

* माध्यमिक शिक्षणस्तरावर व्यावसायिक शिक्षणाची विद्यार्थी संख्या एकूण विद्यार्थ्यात अत्यल्प राहिली. कोठारी आयोगाने हे प्रमाण २.२% इतके असल्याचे हे स्पष्ट झाले.

* व्यावसायिक शिक्षणाकडे येणारे विद्यार्थी हे दुय्यम दर्जाचे शिक्षण प्रवाहापासून वंचित स्वरूपाचे आहेत.

* व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी असणाऱ्या सुविधा गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत अपुऱ्या आहेत.

* एकूण शैक्षणिक गुणवत्ता किंवा क्रमवारी ठरविताना व्यावसायिक शिक्षणातील गुणवत्तेचा वापर फारसा केला जात नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.