ई - अध्ययन

ई अध्ययनाचे स्वरूप
* अध्ययन - अध्यापन व संवाद शास्त्रात नव्या तंत्राचा वापर करून ते परिणामकारक करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. याचाच भाग म्हणजे ई-अध्ययन होय.

* शिक्षणात संगणकाधारित माहितीच्या महाजालाचा वापर करीत केलेले अध्ययन म्हणजे ई - अध्ययन होय. यामध्ये नेटवर्किंग व मल्टीमिडिया तंत्र वापरले जाते.

* ई अध्ययनासाठी विविध तंत्र प्रणाली वापरली जाते. ई - पोर्टफोलियो, PDA, एमपी - ३, पेनड्राइव्ह, सिडी, वेबसाईट, मोबाईल Apps, सॉफ्टवेअर, इमेल, ब्लॉग, आभासी क्लास रूम, यालाच आता ऑनलाईन लर्निग म्हणतात.

* ई लर्निग मध्ये आता मोबाईलचा वापर वाढतो आहे, त्याला आता एम-लर्निग म्हणतात.

* ई लर्निग हे दुरस्त शिक्षणाचे लवचिक अध्ययनाचे एक महत्वाचे साधन आहे.


ई - अध्ययनाचे फायदे
ई अध्ययनाचे विद्यार्थ्यासाठी फायदे
* विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संवाद प्रभावी होते. समजून घेणे सुधारते.
* अध्ययनाच्या विविध शैलीस उपयुक्त आहे.
* विद्यार्थी स्वताच्या गतीने अभ्यास करू शकतो.
* कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी अध्ययन करता येते.
* शिक्षणासाठी प्रवासाचा व वेळेचा खर्च वाचतो.
* संबंधित विषयाचे सखोल ज्ञान होते कारण जागतिक स्तरावरील सर्व माहिती मिळते.
* विद्यार्थी स्वताच्या आवडीप्रमाणे अध्ययन पातळी ठरवू शकतो. संबधित विषयाचे किती सखोल ज्ञान घ्यावे हे तो स्वतः ठरवतो.
* इंटरनेटचा वापर करण्याची सवय लागते व त्याचा पुढे भविष्यात सातत्याने वापर करता येतो.
* स्वयंअध्ययनाची सवय लागते. ज्ञान व आत्मविश्वास वाढतो.

शिक्षकासाठी ई अध्ययनाचे फायदे
* जागतिक स्तरावरील माहिती घेऊन अभ्यास घटक तयार केला जातो.
* अध्यापनासाठी आवाज, चित्रे, रंग, आभास, अशा विविध तंत्राचा वापर करणे शक्य होते.
* विद्यार्थ्यांशी केव्हाही व कोठेही संपर्क साधता येतो.
* विद्यार्थ्यांशी केलेल्या संवादाची प्रत ठेवता येते.
* विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असल्याने वैयक्तिक लक्ष देता येते.
* प्रशिक्षणासाठी प्रवास व राहणे हे खर्च वाचतात.
* अद्ययावत माहिती व ज्ञान देता येते.
* प्रमाणित व उत्तम ज्ञानसाहित्य सतत वापरता येतात.
* परीक्षा व चाचणी अध्ययन प्रगतीनुसार घेत येते.


ई - अध्ययनातील समस्या
* विद्यार्थ्यास संगणक विकत किंवा भाड्याने घ्यावा लागतो म्हणून हि पद्धत खर्चिक आहे.
* तांत्रिक अडचणी वीज खंडीत होणे, नेत कनेक्शन न मिळणे, व संगणक बंद पडणे, अभ्यासात अडचण ठरते.
* विद्यार्थी व अध्यापक यांच्या संगणक ज्ञानातील तफावतीने संवाद साधला जाण्यात अडचण येते.
* इंटरनेटचे दर अधिक आहेत. टेलिफोनचे दर अधिक आहेत.
* इंटरनेटचा वेग कमी असेल तर अध्ययन-अध्यापन आहे.


भारतात ई अध्ययनाची आवश्यकता
* शिक्षणनाच्या सार्वत्रीकरण याचे आव्हान लोकसंख्येचा आकार प्रचंड मोठा असलेल्या देशाला ई अध्ययन अत्यंत उपयुक्त आहे.

* गुणवत्तापूर्ण शिक्षकांची व शैक्षनिक साधनाची टंचाई विचारात घेता ई अध्ययन अपरिहार्य ठरते.

* ई अध्ययनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा विशेषता इंटरनेटची उपलब्दता वाढत असून ई अध्ययन खेड्यामध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण पोहोचविण्यास उपयुक्त आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.