शाहू महाराज


जीवन परिचय - शिक्षण - विवाह
आधुनिक महाराष्ट्रातील आरक्षणाचे जनक वसतिगृहाचा निर्माता दिनदलीताचा कैवारी लोकराजा म्हणून राजश्री शाहू महाराजांना ओळखले जते.

* जीवन परिचय - जयसिंगराव पवार घाटगे हे कागल घराण्याचे जहागीरदार होते. जयसिंगराव आबासाहेब घाटगे व त्यांची पत्नी राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी राजश्री शाहू महाराजांचा जन्म २६ जुलै १८७४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते.

* शिक्षण - इ . स . १८८४ मध्ये महाराजांचा राजकोट येथील राजकुमार कोलेजात पाठवण्यात आले १८८५ ते १८८९ पर्यंत महाराज राजकुमार कोलेजात शिकले . १८९० ते १८९४ या काळात महारांजाचे येथे शिक्षण पूर्ण झाले. सर स्टूआर्ट फ्रेझर आणि रघुनाथ व्यंकाजी सबनीस हे त्यांचे शिक्षक होते.

* विवाह - राजाश्र्री शाहू महाराज यांचा देखील बालविवाह बडोद्याचे गुणाजीरव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई सोबत १ एप्रिल १८८१ मध्ये झाला.  त्यावेली लक्ष्मीबाईचे वय ११ वर्षे होते.

* शाहूचे अधिकार ग्रहण - शाहूंचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लवकरच त्यांनी कोल्हापूरची सूत्रे २ एप्रिल १८९४ रोजी घेतली.

राज्यकारभारातील सुधारणा
लोकांचा आर्थिक विकास घडवण्यासाठी १८९५ साली शाहूपुरी गुळाची बाजारपेठेत बसवली. शेती क्षेत्रासाठी कोल्हापुरी बंधारे बांधले. १९०६ मध्ये शाहू छत्रपती स्पिनिग आणि विवीन मिलची स्थापना केली जाते. १९०७ मध्ये भोगावती नदीवर राधानगरी हे धारण बांधले. धरणाचे बांधकाम झाल्यावर त्याला महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे नाव देण्यात आले . कोल्हापूर येथे जुलै १९२० मध्ये मराठा पुरोहित तयार करण्यासाठी श्री शिवाजी वेदिक विद्यालय सुरु झाले. ११ जानेवारी १९११ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शाहुनी कुलकर्णी  केली. त्या ठिकाणी तलाठी या पदाची नेमणूक केली. १९१६ ला कोल्हापुरात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यात आला. शाहू महाराजांनी १८५१ साली इंग्रजी शाळा सुरु केली. १८८१ मध्ये  रुपांतर राजाराम महाविद्यालयात झाले. शाहू महाराजांनी विजय मराठा, प्रबोधन, दिनमित्र, हंटर, केवारी,तेज, जागरूक, तरुण मराठा, डेक्कण, राष्ट्रवीर, ब्राह्म्ह्नेतर, जागृती, या ब्राम्हणेतर वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली.

समाजसुधारणा
गंगाराम कांबळे या महाराजाच्या हॉटेलात रोज सकाळी शाहू महाराजांनी चहा प्यायचे आणि त्याला हॉटेलसुद्धा लाऊन दिले. कोल्हापूरच्या पश्चिमेस ५५ किलोमीटर अंतरावर दाजीपुरजवळ भोगावती नदीवरबंधारा घालून जमिनीला पाणीपुरवठा करण्याची योजना १९०७ मध्ये आखण्यात आली.विधवा पुनर्विवाहाचा कायदा १२ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे लागू केल. बाबुराव पेंटर व आनंदराव पेंटर यांना कोल्हापूर येथे चित्रपट प्रदर्शनासाठी या दोघा बंधूंना मदत केली. १९०७ साली अस्पृश्यासाठी व विद्यार्थ्यासाठी वसतिगृह सथापन केले. माणगाव जिल्हा कोल्हापूर येथे २२ मार्च १९२० रोजी महाराष्ट्रातील अस्पृश्यासाठी परिषद भरवली होती. १५ एप्रिल १९२० रोजी  येथे श्री उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृह स्थापन केले.मागासलेल्या लोकासाठी ५०% आरक्षण शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये दिले. व त्याचा आदेशही काढला. १९१६ला राज्यातील प्रत्येक विद्यार्थाना  शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे केले व एक रुपया शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. १५ एप्रिल १९२० रोजी नाशिकमधील श्री उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाची उभारणी केली.

शाहू महाराजांनी स्थापन केलेले वसतीगृह
वसतिगृहाचे नाव  -  स्थापन वर्ष
 • व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग - १९०१
 • दिगंबर जैन बोर्डिंग - १९०१
 • विरशेव लिंगायत विद्यार्थी परिषद - १९०६
 • मुस्लिम बोर्डिंग - १९०६
 • मिस क्लार्क होस्टेल - १९०८
 • श्री नामदेव बोर्डिंग - १९११
 • पांचाल ब्राह्मण वसतिगृह - १९१२
 • इंडिअन ख्रिचन होस्टेल - १९१५
 • आर्य समाज गुरुकुल - १९१८
 • ढोर चांभार बोर्डिंग - १९१९
 • श्री प्रिन्स शिवाजी वेदिक वसतिगृह - १९२०
 • सुतार बोर्डिंग - १९२१
 • सोमवंशीय आर्य क्षत्रिय बोर्डिंग - १९२०

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.