अणुचाचणी

अणुचाचणी
* हिंदुस्तानातील स्वतंत्र मिळाल्यानंतर पंतप्रधान पं नेहरू यांनी रोजी १९४८ मध्ये अणूधोरण मंजूर केले. त्यानुसार केंद्र सरकारने अणुउर्जा आयोगाची स्थापना केली.

* तसेच एनर्जी एस्टब्लीशमेंट ऑफ ट्रॉम्बेची स्थापना सन १९५४ मध्ये करण्यात आली. सन १९४८ ते १९५४ या काळात अणुउर्जा आयोगाचे कार्य नैसर्गिक स्त्रोत आणि वैज्ञानिक संशोधन मंत्रालयाच्या अख्यत्यारीस होते.

* तसेच ४ अगस्ट १९५७ रोजी हिंदुस्तानने अप्सरा हि पहिली अणुउर्जा भट्टी कार्यान्वित केली. तुर्भे येथेच सन १९५८ सायरस व सन १९६१ मध्ये झर्लीना ही अणुभट्टी कार्यान्वित केली.


जागतिक स्तर
* आज अमेरिकेजवळ ८,७३३ परमाणु अस्त्रे आहेत. तसेच अमेरिका अविकसनशील राष्ट्रांना दरवर्षी ९८९ कोटी अमेरिकेची डॉलर्स युद्धसामुग्री विकतो आहे.

* हिरोशिमा व नागासाकी या शहरावर टाकलेले अणुबॉम्ब १५ व २० किलो टन शक्तीचे होते. इथे १५० किलो टन हे किमान प्रमाण धरलेले आहे.

* जगातील प्रमुख अणुभट्ट्या अमेरिकेत १०९, फ्रान्समध्ये ५६, जपानमध्ये ४९, इंग्लंड ३५, रशिया २९, कॅनडा २२, जर्मनी २१, युक्रेन २१, स्वीडन १२, भारतात १० आहेत. भारताने अलीकडेच अण्वस्त्र कमांड प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.


पोखरण चाचणी १
* पोखरण चाचणी मोहीम - आनंदी बुद्ध हसरा [Operation Smiling Buddha ] असे या पोखरण चाचणीचे देण्यात आले.

* भारताच्या या अणुचाचणीत स्फोटाला आनंदी बुद्धा हे सांकेतिक नाव देण्यात आले, या अनुचाचणीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळातील पाच सदस्यांनी दिली.

* त्या बॉम्बची क्षमता ९ kt TNT एवढी आहे. कालावधी १९७४ रोजी हि चाचणी घेण्यात आली. चाचणीचा प्रकार भूगर्भचाचणी आहे. स्फोट प्रकार फिजन आहे.

* ७ सप्टेंबर १९७२ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भाभा अनु संशोधन केंद्राला अणुनिर्मिती आणि चाचणीची परवानगी दिली आहे.


पोखरण चाचणी २
* या मोहिमेचे नाव शक्ती असे देण्यात आले, चाचणीचे स्थान भारतीय लष्कर स्थळ तळ रेंज पोखरण हे होते. ही मोहीम ११ मे १९९८ या वर्षी झाली.

* चाचणीची संख्या ५ एवढी आहे, चाचणी क्रमांक भूगर्भात जमिनी अंतर्गत करण्यात आली, याचा डिव्हाइस प्रकार फ्युजन असा होता. याची कमाल उत्पत्ती ५८kt हा आहे.

* या अणुचाचणीचे प्रकल्प मुख्य समन्वयक संरक्षण संशोधन विकास संघटनेचे प्रमुख डॉ ए पी जे अब्दुल कलाम आणि अणुउर्जा विभागाचे चेअरमन डॉ आर चिदंबरम होते.

* या अणुचाचणीचे परिणाम असे झाले की चीनने भारताने अण्वस्त्र प्रसारबंधीवर सही करण्यात आले. जपानने देखील भारतावर आर्थिक निर्बंध आणले.


अणूचे उपयोग
* विद्युतनिर्मिती - जगातील कोळशाचे साठे संपत असून पर्यायी विद्युत म्हणून अणुविद्युत यांचा वापर करणे अनिवार्य आहे.

* मार्गण तंत्र - रासायनिक प्रक्रीयामध्ये एखाद्या मुलद्रव्याच्या किर्नोस्तारी समस्थानिकांना समावेश करण्यात व त्याच्या किरणोत्साराचा उपकरणाद्वारे शोध घेवून त्याचा मार्ग ठरवितात.

* किरणोत्सर्गी व कृषी उपयोग - खाद्य पदार्थ खराब होणार नाहीत व ते जास्त दिवस टिकून राहतील यासाठी किरणोस्तर्गी समस्थानिकांचा मार्गन द्रव्य म्हणून उपयोग होतो.

* विश्लेषण - त्याद्वारे बदललेल्या स्थिर समस्थानिकांचे प्रमाण समजन्यासाठी द्रव्यमान वर्णपट पद्धतीचा उपयोग करावा लागतो.

* वैद्यकीय उपयोग - शरीरातील राक्तभिसारण नीटपणे होत नसेल आणि प्रवाहास कोठे अडथला येत असेल तर  शोधण्यासाठी किर्नोस्तारी सोडियमचा उपयोग करतात.

* कालगणना - पृथ्वीच्या अंतरंगातील पोटशिअम आणि आरगॉन यांच्या प्रमाणावरून वयोमान निश्चित करता येते. विविध पुरातन अवशेषांचा काळ ठरविण्यासाठी कार्बन या किर्नोस्तारी समस्थानिकांचा उपयोग होतो.

* रोगनिवारण - कॅन्सरसारख्या रोगावर कोबाल्ट याचा उपयोग केला जातो. या रेडियेशनमुळे अनेक प्रकारचे ट्युमर्स काढून टाकता येतात.

* इंधन - अणुशक्तीचा इंधन म्हणून उपयोग रेल्वे, गाड्या, पाणबुड्या, विमाने, जहाजे, इत्यादीमध्ये केला जातो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.