राष्ट्रीय आरोग्य धोरण ५

आरोग्य धोरण
* सरकारच्या आरोग्य विभागाने २००२ साली राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केले जे २००२ सालीच मंत्रिमंडळाकडून मान्य करण्यात आले.

* पोलिओचे समूळ उच्चाटन करणे, महारोगाचे समूळ उच्चाटन करणे.

* एकत्मित स्वरुपाची पाळत व्यवस्था, राष्ट्रीय आरोग्य जमा खर्च, हिशॆब, आरोग्य माहिती व्यवस्थापन स्थापना करणे.

* काळा आजाराचे उच्चाटन करणे, एचआयव्ही एड्सची वाढ शून्य करणे,

* क्षयरोग, हिवताप, व पाण्यापासून उद्भवणाऱ्या मृत्यूचा दर कमी करणे. अंधत्वाचे अस्तित्व ०.५% पर्यंत करणे.

* अर्भक मृत्यूदर व प्रसूती दरम्यान मृत्यूदर अनुक्रमे दरहजारी ३० व दरलाखामागे १०० इतका कमी करणे.

* सार्वजनिक आरोग्य सुविधांचा वापर सध्याच्या २०% पेक्षा कमी असून तो वाढवून ७५% च्या वरती नेणे.


आरोग्यावरील समस्या व उपाय
* भारताच्या बाबतीत हे अपेक्षित आयुर्मान १९५१ साली पुरुषामागे ३७.२ वर्षे इतके झाले. ते २००१ मध्ये ६२.३ वर्षे इतके झाले.

* दारिद्रय - दारिद्रय हे लोकांच्या आरोग्याचे खालावलेले कारण आहे.

* आहार - चांगल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात सकस आहार भारताच्या बाबतीत दारिद्रयरेषा ही या स्वरुपात मोजली जाते.

* पारंपारिक आजारावर पूर्णपणे नियंत्रणाचा अभाव - भारतात नियोजन काळात लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी फार मोठी आरोग्य व्यवस्था उभी करण्यात आली.

* नवीन उद्भवणारे आजार, बदलते राहणीमान, अपुऱ्या आरोग्य सुविधा, यांचा परिणाम आरोग्यावर होतो.


आरोग्य अहवाल
* देशामध्ये बालके व मातांचे आरोग्य यांचा अभ्यासपूर्ण अहवाल कुपोषण विरोधी नागरी संघटन यांच्या प्रयत्नातून प्रकाशित करण्यात आला.

* ज्या राज्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता होती अशा बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा, हिमाचल प्रदेश, तुलनेने तमिळनाडू व केरळ या राज्यांचा अभ्यासासाठी निवड करण्यात आली.

* ११२ जिल्ह्यांचा अभ्यास झाला असून यामध्ये १०० जिल्हे लक्ष्य केंद्रित जिल्हे तर ६ जिल्हे निवडलेल्या मागास राज्यातील उत्तम जिल्हे होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.