महाराष्ट्रातील नदीप्रणाली

पूर्ववाहिनी नद्या
सह्यान्द्री पर्वतामध्ये उगम पावून दख्खनच्या पठरावरून पूर्वेकडे  जाणाऱ्या नद्याना पूर्ववाहिनी नद्या असे म्हणतात. दख्खनच्या पठारावरून गोदावरी,भीमा,आणि कृष्णा  या नद्या पूर्वेस तसेच आग्नेय दिशेस वाहत जातात.

पश्चिमवाहिनी नद्यासह्यान्द्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे संपूर्ण पर्वत ओलांडून कोकण किनारपट्टीतवरून वाहत जाण्यारा नद्यांना पश्चिमवाहिनी नद्या म्हणतात. कोकणामध्ये वैतरणा, उल्हास, सावित्री यासारख्या नद्या अरबी समुद्राला मिळतात.सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावणाऱ्या तापी व पूर्णा नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात.

महाराष्ट्रातील नद्यांची खोरी -

गोदावरी खोरी
दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी  दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. भारतातील गंगा नदीच्या खालोखाल  नदीचे पात्र आहे. हिला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात. सह्यान्द्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबककेश्वरच्या ब्रम्हगिरीच्या टेकडी गोदावरीचा उगम झालेला आहे. दख्खनच्या पठारावरून वाहणारी ही नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश वाहत जाऊन मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करून पूर्वेस बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. गोदावरीची एकूण लांबी सुमारे १४६५ कि मी असून तिचे नदिप्रणालीचे क्षेत्र १५३७७९ चौ कि मी आहे. महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यातून दरवर्षी सुमारे ३७८३० दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो.संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे. गोदावरीच्या उजव्या तीरावरून किंवा दक्षिण भागाकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोरा,सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, या नद्या मिळतात. तर डाव्या तीरावरून म्हणजेच उत्तरेकडून कादवा,शिवना,खाम,नद्या मिळतात.

गोदावरी नदीचे खोरी
दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी  दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. भारतातील गंगा नदीच्या खालोखाल  नदीचे पात्र आहे. हिला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात. सह्यान्द्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबककेश्वरच्या ब्रम्हगिरीच्या टेकडीवर गोदावरीचा उगम झालेला आहे. दख्खनच्या पठारावरून वाहणारी ही नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश वाहत जाऊन मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करून पूर्वेस बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. गोदावरीची एकूण लांबी सुमारे १४६५ कि मी असून तिचे नदिप्रणालीचे क्षेत्र १५३७७९ चौ कि मी आहे. महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यातून दरवर्षी सुमारे ३७८३० दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो.संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे. गोदावरीच्या उजव्या तीरावरून किंवा दक्षिण भागाकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोरा,सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, या नद्या मिळतात. तर डाव्या तीरावरून म्हणजेच उत्तरेकडून कादवा,शिवना,खाम,नद्या मिळतात.


भिमा नदीचे खोरे
गोदावरी  नदीच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये कृष्ण नदीचे खोरे आहे. परंतू कृष्णा नदीची उपनदी भीमा हिने महाराष्ट्राच्या बरासचा भाग व्यापलेला आहे. भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर येथे आहे. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.  आग्नेयेस ४५१ कि.मी. आहे. कर्नाटकात रायचूरजवळ कुरुगुडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम होतो. भिमा नदीस उजव्या किनाऱ्याने म्हणजे दक्षिणेकडून भामा,इंद्रायणी,मुळा,मुठा,नीरा,माण, तसेच डाव्या बाजूने उत्तरेकडून वेळ,घोड,सीना, मिळतात.


कृष्णा नदीचे खोरे
महाराष्ट्राच्या पठारावरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या खालोखाल कृष्णा ही नदी आहे. दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पुढे बंगालच्या उपसागरात मिळते. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला १२२० मीटर उंचीवर झाला. कृष्णा नदीच्या उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस ६५ कि मी अरबी समुद्र आहे. (क्षेत्र महाबळेश्वर) कृष्णा,  कोयना, भाग्यश्री, सावित्री, या पाच नद्यांची उगम क्षेत्रे पहावयास मिळतात. महाराष्ट्रात,कर्नाटक,आंध्रप्रदेश, या तीन राज्यातून कृष्णा नदी वाहत जाते व शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण झाल्यावर मच्छलीपट्ट्नंम जवळ बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. कृष्णा नदीची एकूण लांबी १४०० कि मी असून नदीप्रनालीचे क्षेत्र २५८९४८ चौ कि मी आहे. महाराष्ट्रातून कृष्णेचे क्षेत्र २८७०० आहे. कृष्णा नदीला बहुतेक सर्व नद्या उजव्या किनाऱ्याने पश्चिम कडून मिळतात. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, या नद्या उजव्या किनाऱ्याने तर येरळा नदी डाव्या किनाऱ्याने कृष्णेस मिळते.


तापी नदीचे खोरे
तापी नदीचा उगम मध्यप्रदेश सातपुडा पर्वत रांगावर मुल्ताई येथे होतो. नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्रास नदी मिळते. तापी नदीची  लांबी २०८ कि मी असून नदीप्रनालीचे क्षेत्र ३१६६० चौ कि मी आहे. यापैकी महाराष्ट्रात तापी नदीची लांबी २०८ कि मी असून नदीप्रनालीचे क्षेत्र ६५१५० चौ कि मी आहे. महाराष्ट्रात तापी नदीच्या खोऱ्यातून दरवर्षी पाण्याचा प्रवाह सुमारे ७२५० दशलक्ष घनमीटर वाहतो. तापी नदीच्या उपनद्या - तापी नदी विदर्भाच्या पश्चिम भागातून वाहत येणारी पूर्ण नदी मिळते. हि तापीची मुख्य नदी आहे. तापी नदीला उजव्या बाजूने चंद्रभागा, शहानुर, नंदवान, या उपनद्या मिळतात. बहुतेक सर्व नद्या सातमाळा, अजिंठा डोंगरात उगम पावून दक्षिणोत्तर वाहून डाव्या किनाऱ्याने तापीला मिळतात. या उपनद्या पेढी,काटेपुर्ण, मोर्णा, मन, व नळगंगा. तर तापी पूर्णाच्या संयुक्त प्रवाहास पुढे पश्चिमेकडे वाघुर,गिरणा,बोरी,पांजरा,बुराई,या उपनद्या मिळतात. 

1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.