ग्रामीण भागातील संरचनात्मक विकास

संरचनात्मक विकास - वीज
* ८ ते ९% राष्ट्रीय उत्पन्न वाढेल असे गृहीत धरल्यास सन २०१७ पर्यंत भारतीय नागरिकाचे दरडोई उत्पन्न वास्तव स्वरुपात दुप्पट होईल.

* वीजक्षेत्राच्या बाबतीत विचार करता अकराव्या पंचवार्षिक योजनेत ८ ते ९% वृद्धीदर प्राप्त करण्यसाठी ६०,००० मेगावट इतकी जादा वीजनिर्मिती करावी लागते.

* नव्या विद्युत केंद्रासाठी कोळसा किंवा नैसर्गिक वायू पुरवठ्याची हमखास व्यवस्था करणे.

* विद्युतनिर्मिती साठी वापरले जाणारे इंधन ज्या राज्यात मिळते त्याना द्याव्या लागणाऱ्या रॉयल्टी संबधी राष्ट्रीय एकमत तयार करणे.

* दीर्घकालीन वित्तपुरवठा तयार करणे.

* केंद्रीय वीज केंद्रांना सध्या देण्यात येणारा कंटेनर परतावा दर कमी करून राज्यांचा वीज दर कमी करणे.

* आंतर विद्यूत वहनाची कार्यक्षम व पुरेशी व्यवस्था निर्माण करणे.

* विद्युत वाटपाची कार्यक्षम व्यवस्था निर्माण करून विद्युत पुरवठ्याच्या विस्ताराची सक्षम व्यवस्था करणे.

* औष्णिक विद्युत केंद्राचे पुनर्वसन करणे आणि त्यांचा प्लांट लोड वाढविणे.

* जलविद्युत केंद्राची क्षमता वाढविणे. 

संरचनात्मक विकास - संदेशवहन व वित्तपुरवठा
* माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान उद्योगांचा आणि विशेषता संगणकाचा वेगाने विस्तार झाल्यामुळेच हे क्षेत्र भारताच्या विकासासाठी महत्वाचे आहे.

* ग्रामीण भागात निर्माण होणारे उत्पन्न नागरी भागाकडून पुरविल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांवर खर्च होत असतो. परिणामी रोजगार निर्मितीचा गुणक परिणाम नागरी भागाला अनुकूल ठरत आहे.

* बदललेल्या जागतिक स्पर्धेत भारतातील ग्रामीण समाजाला टिकून राहण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व जैविक तंत्रज्ञाची क्षमता असणारे तरुण [ ग्रामीण कृषी उद्योजक ] निर्माण करावे लागतील.

संरचनात्मक विकास - शिक्षण
* उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात अधिक महत्व विज्ञान आणि तंत्रज्ञान दिले जाणार आहे.

* मुलभूत संशोधनासाठी अधिक निधी व राष्ट्रीय व्यवस्था करणे.
* विज्ञान व तंत्रज्ञानातील मनुष्यबळ वाढविणे व परिरचना वाढविणे, उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी शोधणे व त्यांच्या संशोधन कार्यासाठी मदत करणे. व सेवाशर्ती सुधारणे.

* तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे. जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरू शकतील अशा संशोधन सेवा केंद्रे उभी करणे व या बाबतीत सार्वजनिक खाजगी भागीदाराला प्रोत्साहन देणे.

* उच्च शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्यातील आंतरक्रिया संशोधनासाठी देवाण घेवाण आणि संयुक्त प्रकल्पांना प्रोत्साहन देणे.

* विज्ञान व तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक संबंध प्रस्थापित करणे व आंतरराष्ट्रीय मोठ्या कार्यक्रमांत सहभागी होणे.

* देशाच्या पातळीवर NIT व IIT कमिशन स्थापन करणे व त्याच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञान प्रशासकीय वित्तीय कार्यक्रमात सहभागी होणे.


ग्रामीण संरचना
* मुलभूत गरजांपैकी निवासाची व घराची आवश्यकता असते.  त्यामुळे राष्ट्रीय गृह धोरण १९९८ ला जाहीर आले. याचे उदिष्ट सर्वाना घरे असे आहे.

* २००१ साली प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरु करण्यात आली. त्यातून गृहबांधणीला चालना मिळाली.

* इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यात आले.

* प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ग्रामीण आवास यामुळे ग्रामीण घरासाठी सवलतीची कर्जे, ग्रामीण बांधकाम केंद्रे उपलब्द करून देण्यात आली.

* हुडको करिता अधिक समभाग भांडवल पुरवठा, समग्र आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण आवास कार्यक्रम या योजना आखण्यात आल्या.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.