शासकीय शैक्षणिक योजना आणि कार्यक्रम

शालेय पोषण आहार
* सन १९९५-९६ पासून हि योजना केंद्रशासनाने सुरु केली असून परिणामांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी योजना आहे.

* या योजनेची उदिष्टे - उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, मुलांचे कुपोषण थांबविणे, प्राथमिक शाळातील उपस्थिती वाढविणे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे.

* शाळातील गळतीचे प्रमाण थांबविणे.

* मुलांच्या मनात शाळेबाबत ओढ निर्माण करणे.


मदतीचे स्वरूप
* उपस्थिती भत्ता - मागासवर्गीयांना मुलींना सन १९९१ ते ९२ पासून हा भत्ता दिला जातो. तो प्रतिदिन १ रुपया असतो. मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी हि योजना उपयुक्त ठरली आहे.

* पुस्तक पेढी योजना - १९७६ साली सुरु केलेल्या ही योजना १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली आहे. पालकांना आपल्या मुलांचा पुस्तकांचा खर्च झेपत नाही. हि योजना प्राथमिक व माध्यमिक शाळांना लागू आहे.

* मुलीना मोफत पास - अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेंतर्गत सन १९९६ पासून ५ वी ते १० वी पर्यंतच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिना शाळेत जाण्यासाठी हि सुविधा दिली जाते. हि सुविधा फक्त ग्रामीण भागात स्थानिक मुलींसाठी आहे.
योजनेच्या एकूण खर्चाच्या ३३% खर्च शासन व उर्वरित खर्च एस टी महामंडळ उचलते.

* सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती - ही योजना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी आहे. यासाठी ८ वी ते १० वी च्या वर्गातील मुलीना निवडले जातील.

* गुणवत्ता शिष्यवृत्ती - गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रगतीत मदत करण्याच्या भूमिकेतून विविध शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आल्या. जसी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती - यात १० महिन्यासाठी ५ वी ते ७ वीसाठी दरमहा २५ रुपये तर ८ वी ते ११ वी पर्यंत दरमहा ४० रुपये दिले जातात.

* ग्रामीण शिष्यवृत्ती - ही शिष्यवृत्तीदेखील महाराष्ट्र राज्य महामंडळाने घेतलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक सपर्धा परीक्षेच्या माध्यमातून दिली जाते. यात ५ ते ७ या वर्गासाठी ५० व ८ ते १० वी साठी ७५ व ११ ते १२ वी साठी दरमहा १०० रुपये दरमहा दिले जातात.

* सैनिकी शिक्षण शिष्यवृत्ती - मुलीना सैनिकी शाळेत १४ ते २५ वर्षे वयोगटातील मुलीना शिष्यवृत्ती येते.

* राष्ट्रीय व राज्य प्रज्ञा शोध परीक्षा - १३ ते १४ वयोगटातील ८ वी च्या वर्गातील विद्यार्थी पात्र असतात. एकूण ४०% व प्रत्येक विषयात ३५ % गुण असावे लागतात. याला उतप्न्नाची अट नाही. शिष्यवृत्ती १५०% रुपये इतके मिळते.

* सांस्कृतिक शिष्यवृत्ती - १० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना नृत्य, नाट्य, संगीत, रंग, चित्रकला, शिल्प या क्षेत्रातील कौशल्य यास ६०० ते १,२०० शिष्यवृत्ती मिळते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.