अलिप्ततावाद आणि पंचशील तत्वे


* भारताने अलिप्तता धोरणाचा स्विकार केला असून कोणत्याही प्रभावशाली गटात सामील न होता स्वतःचे स्वतंत्र अबाधित राहण्यासाठी आणि स्वतःच्या राष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारताने अलिप्ततावाद धोरणाचा स्वीकार केला.

* अलिप्ततावाद हा कोणत्याही गटामध्ये सहभागी होत नाही.

* अलिप्ततावाद आपल्या देशात कोणत्याही महाशक्तीला लष्करी छावण्या किंवा सैनिकी अड्डे उभारण्यास मदत करीत नाही.

* स्वतःचे अंतर्गत प्रशासन शिवाय बहिर्गत धोरण स्वतंत्र आखून त्याची अंमलबजावणी करते.

* अलिप्ततावाद वसाहतवादाला विरोध करून जागतिक शांतता व सहकार्य यासाठी प्रयन्त करते.

* भारताचा अलिप्ततावाद आशिया व आफ्रिका खंडात परस्परांमध्ये सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करतात.

* आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ढवळाढवळ न करता शक्यतो राष्ट्रासोबत मैत्रीचे व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करते.

* अलिप्ततावाद दोन्ही महाशक्तीचे संबंध प्रस्थापित करून दोन्ही शक्ती सोबत मैत्र सलोख्याचे संबंध प्रस्थापित करते.

* जागतिक संघर्षाचा धिक्कार अलिप्ततावाद करून न्यायाच्या बाजूने समर्थन करते.

* कोणत्याही महाशक्तीची मित्रत्वाने संबंध प्रस्थापित करून आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक इ प्रकारची मदत घेवू शकते.

अलिप्ततावादाचे गुण
* अलीप्ततावादामुळे अमेरिका आणि रशिया या दोन्ही महाशक्तीचे शीतयुद्ध कमी झाले.
* अलिप्ततता वादामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाला लोकशाहीचे स्वरूप प्राप्त झाले.
* अलिप्ततावादामुळे जगात कल्याणकारी आणि मानवतावादी दुष्टीचा प्रयन्त सुरु झाला.
* जागतिक पातळीवर संघर्ष सोडवण्यासाठी धोरण महत्वाचे ठरले.
* जगा आणि जगू द्या या धोरणाचा पुरस्कार करून अलिप्ततावाद निर्माण झाला.

अलीप्तवादाचे दोष
* कोणत्याही महाशाक्तीत समाविष्ट न होता स्वतः आपल्या राष्ट्राचा संपूर्ण विकास करणे शक्य नसते.
* तटस्थ राहून राष्ट्र स्वयंपूर्ण बनू शकत नाही केव्हा अमेरिकेसोबत तर केव्हा रशियासोबत संबंध प्रस्थापित करावे लागते.
* भारताने अलिप्ततता धोरणाचा स्विकार केला असला तरी वारंवार मात्र वेळ आणि परिस्थितीनुसार भूमिका बदलेली दिसते.
* अलिप्तता चळवळ हि स्वतंत्र राहिली नसून अशा राष्ट्रांचा देखील एक गट तयार झालेला दिसतो.
* अलिप्तता धोरणामुळे प्रगत राष्टांचा पाहिजे तेवढ्या प्रमाणात फायदा मिळविता आला नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.