महाराष्ट्रातील वने

उष्ण कटीबंधीय सदाहरित वने
महाराष्ट्रामध्ये कोकण भागात सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पहावयास मिळतात. ज्या प्रदेशात २०० पेक्षा जास्त पर्जन्य पडते त्या भागात सदाहरित वने असतात. प्रदेशातील भरपूर प्रदेश, आद्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये हुयमसचे प्रमाण, या वृक्षांची  उंची ४५ ते ६० मी. दरम्यान असते. वृक्षांचे सदाहरित नागचंपा,पांढरा सिडार, फणस , कावसी, जांभूळ, प्रकार व उदाहरणे आहे आहेत.
आर्थिक महत्त्व - या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

उष्ण कटिबंधीय निमसदाहरीत वने
वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळते. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पहावयास असतो. त्याचप्रमाणे सह्यान्द्री पर्वताच्या पश्चिम भागात घटनास्थळवरही काही वनस्पती आढळते. विशेषत: आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. या वनात आढळणारे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा  उंचीची असतात.निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिशस, बिबळा, वगैरे. या वनातील वृक्षांचा आईन,नाना,वायळी, हे वृक्ष महत्त्वाचे आहेत.

उपउष्ण कटीबंदीय सदाहरित वने
महाराष्ट्रात ही अरण्ये प्रामुख्याने २५० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर,  पाचगणी, माथेरान आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण,तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता या सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा,हिरडा, आंबा, बेहडा, कारवी हे  वृक्ष आढळतात. अनेक झाडांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग होतो. हिरडा या झाडाचे लाकूड चांगले टणक असते.

उष्ण कटीबंधीय आद्र पानझडी अरण्ये
सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात घाटमाथ्याच्या पूर्वेस कमी उंचीच्या टेकडीवर हे वृक्ष आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से मी अरण्यात असलेली ही
अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बरेचसे वृक्ष पर्णहीन असतात. उष्ण कटीबंधीय रुक्ष ,धावडा,शिसम,तेंदू,पळस,बिज्साल,लेडी,हेडी,बेल,खैर,
अंजन,ई. आर्थिक महत्व या अरण्यातील अनेक वनस्पतींचा उपयोग हा टिंबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैर सारख्या वनस्पतीचा उपयोग कात निर्माण करण्यासाठी केला जातो.

उष्ण कटीबंधीय काटेरी वने
दख्खनच्या पठारावर मध्य महारष्ट्रात नद्याच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर  आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही वने आढळतात. बाभूळ, खैर, हिवर, हे वृक्ष आढळतात. तारवड सारख्या झुडूपाचा उपयोग केला जातो.

4 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.