भारत पुरस्कार व सन्मान

भारतरत्न पुरस्कार
* भारत सरकार तर्फे दिला जाणारा देशातील सर्वोच नागरी पुरस्कार आहे.
* ज्ञान, विज्ञान, कला, वाडःमय, सेवा, या क्षेत्रात सर्वोच योगदानाबदल दिला जानारा सर्वोच नागरी पुरस्कार रोख २,५०,००० रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे स्वरूप
* भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. नावापुढे जन्म व मृत्यूचे साल दिले आहे शेवटी कंसात पुरस्कार प्रदान केलेले वर्ष दिलेले आहे.

* चक्रवर्ती राजगोपालाचारी १८७८-१९७२ : स्वतंत्र भारताचे पाहिले व शेवटचे गव्हर्नर [१९५४].
* सर्वपल्ली राधाकृष्णन १८८८-१९७५ : उपराष्ट्रपती व राष्ट्रपती, थोर तत्ववेत्ता व शिक्षणमहर्षी [१९५४]
* डॉ चंद्रशेखर व्यंकटरमण १९८८-१९७० : शास्त्रज्ञ व नोबल पारितोषिक विजेता [१९५४]
* डॉ भगवानदास १८६९-१९५८ : वेदांचे अभ्यासक [१९५५]
* पं जवाहरलाल नेहरू १८८९-१९६४ : पंतप्रधान व आधुनिक भारतचे शिल्पकार [१९५५]
* डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या १८६१-१९६२ : प्रसिद्ध स्थापत्य अभियंता व प्रशासक [१९५५]
* गोविंद वल्लभपंत १८८७-१९६४ : भारताचे गृहमंत्री [१९५७]
* महर्षी धोंडो केशव कर्वे १८५८-१९६२ : समाजसुधारक व भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाचे जनक [१९५८]
* डॉ बिधन चंद्र रॉय १८८२-१९६२ : भारताचे एक विख्यात डॉक्टर [१९६१]
* पुरुषोत्तम टंडन १८८२-१९६२ : भारतीय स्वतंत्र सेनानी [१९६१]
* डॉ राजेंद्र प्रसाद १८८४-१९६२ : राष्ट्रपती व स्वतंत्रसेनानी [१९६२]
* डॉ जाकीर हुसेन १८९७-१९६९ : उपराष्ट्रपती [१९६३]
* डॉ पांडुरंग वामन काणे १८८०-१९७२ : सामाजिक कार्यकर्ते [१९६३]
* लाल बहादूरशास्त्री १९०४-१९६६ : पंतप्रधान व भारत पाक युद्धाचे शिल्पकार [१९६६]
* इंदिरा गांधी १९१७-१९८४ : पंतप्रधान [१९७१]
* डॉ वराहगिरी व्यंकट रमण १८९४-१९८० : राष्ट्रपती व उपराष्ट्रपती [१९७५]
* कुमारस्वामी कामराज १९०३-१९७५ : काँग्रेसचे अध्यक्ष व राष्ट्रीय चळवळीतील नेते [१९७६]
* मदर तेरेसा १९१०-१९९७ : थोर समाजसेविका [१९८०]
* आचार्य विनोबा भावे १८९५-१९८२ : भूदान चळवळीचे प्रणेते [१९८३]
* खान अब्दुल गफार खान १८९० -१९८८ : भारतीय चळवळीचे नेते [१९८७]
* बाबासाहेब आंबेडकर १८९१-१९५६ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [१९९०]
* राजीव गांधी १९४४-१९९१ - भारताचे पंतप्रधान भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते [१९९१]
* सरदार वल्लभभाई पटेल १८९६-१९९५ भारताचे पोलादी पुरुष [१९९१]
* रतनजी टाटा १९०४-१९९३ प्रसिद्ध उद्योगपती [१९९२]
* अब्दुल कलाम १९३१-२०१५ : भारताचे राष्ट्रपती व भारताचे क्षेपणास्त्र जनक [१९९८]
* अमर्त्य सेन - अर्थशास्त्री [१९९९]
* पंडित रविशंकर - प्रसिद्ध सतारवादक [१९९९]
* उस्ताद बिस्मिल्ला खान - भारतीय सनईवादक [२००१]
* लाता मंगेशकर - भारताची गानकोकिळा [२००१]
* पंडित भीमसेन जोशी - प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक - [२००८]


नोबेल पुरस्कार
* सर अल्फ्रेड नोबेल १८३३-१८९६ या स्वीडिश शास्त्रज्ञाने डायनामाईट स्फोटकांचा शोध लावला. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रानुसार आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा विश्वस्त निधी स्वरूपात सुरक्षित ठेवींमध्ये राखून ठेवला.
* या निधीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे समान भाग करून त्यातून दरवर्षी १] भौतिकशास्त्र २] रसायनशास्त्र ३] शरीर विज्ञानशास्त्र अथवा वैद्यकशास्त्र ४] साहित्य ५] शांतता यात उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.
* हा पुरस्कार सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ बँक ऑफ स्वीडनकडून दिला जातो.
* नोबेल यांच्या मृत्यूनंतर १९०१ पासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. सोन्याचे पदक व रक्कम स्वीडनची राजधानी स्टोकहोम दिले जाते.
* तर शांततेसाठी नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन नोबेल कमिटीमार्फत नॉर्वेची राजधानी ओस्लो येथुंन दिला जातो.
* रवींद्रनाथ टागोर - साहित्य १९१३, चंद्रशेखर व्यंकट रमण - भौतिकशास्त्र १९३०, हरगोविंद खुराणा अमेरिक - वैद्यक - १९६८, मदर तेरेसा - शांतता १९७९, डॉ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर - अमेरिका भौतिकशास्त्र १९८३, डॉ अमर्त्यसेन - अर्थशास्त्र १९९८, वेंकटरमण रामकृष्णन - अमेरिका रसायनशास्त्र २००९ इत्यादी भारतीयांना पुरस्कार मिळाला आहे.


रॅमन मॅगसेसे पुरस्कार
* रेमन मॅगसेसे फिलिपाइन्सचे तिसरे अध्यक्ष यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप ५५,००० डॉलर्स व सन्मानचिन्ह दिला जातो.
* सामाजिक नेतृत्व, जनसेवा, आंतरराष्ट्रीय सामंजस्य, शासकीय सेवा, व समाजसेवा, साहित्य, पत्रकारिता, ललिताकला अशा क्षेत्रात आशियाई व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
* डॉ व्ही शांता २००५, दीप जोशी २००९, प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे २००८, पी साईनाथ २००७ इत्यादी.


परमवीरचक्र पुरस्कार
* युद्धातील असामान्य कामगिरीबद्दल हा सर्वोच्च लष्करी पुरस्कार दिला जातो.
* भारत पाकिस्तान लढाईत मेजर सोमनाथ शर्मा १९४७, नाईक करमसिंग १९४८, यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर केला.
* भारत चीन युद्धात मेजर धनसिंग थापा १९६२ गुरखा रायफल्स, जोगिंदर सिंग यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
* भारत पाकिस्तान कारगिलची लढाई १९९९ मधील कॅप्टन विक्रम बत्रा मरणोत्तर १९९९, मनोज कुमार पांडे १९९९ यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.


इतर पुरस्कार
* दादासाहेब फाळके पुरस्कार - भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ भारतीय चित्रपट सृष्टीत असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो, १,००,००० लाख रोख व सुवर्णकमळ दिला जातो.
* ज्ञानपीठ पुरस्कार - उद्योग व्यापार क्षेत्रातील एक नामवंत उद्योगपती शांतिप्रसाद जैन यांच्या पुरस्काराने भारतीय ज्ञानपीठतर्फे उत्कृष्ट वाडःमयीन कर्तृत्व दाखवणाऱ्या श्रेष्ठ भारतीय लेखकास हा पुरस्कार दिला जातो. २,५०,००० रोख सरस्वतीची कास्य प्रतिमा व प्रशस्तीपत्रक दिल जातो.
* साहित्य अकादमी पुरस्कार - भारतीय भाषांतील उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकांना साहित्य अकादमी तर्फे हा पुरस्कार दिला जातो.
* जागतिक सौन्दर्य स्पर्धा - भारतीय स्त्रियांना सर्वोच्च सन्मान प्राप्त केले आहेत. मिस युनिव्हर्स - विश्वसुंदरी - सुश्मिता सेन १९९४, लारा दत्ता - २०००, मिस वर्ल्ड - जगत सुंदरी ऐश्वर्या रॉय - १९९४, डायना हेडन - १९९७, युक्ता मुखी १९९९, प्रियांका चोप्रा - २०००

3 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.