जहालवादाचा उदय व बंगाल ची फाळणी


जहालवाद्याच्या उदयाची कारणे
* आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव
* राज्यकर्त्यांची आर्थिक पिळवणूक
* नैसर्गिक आपत्तीसंबंधी राज्यकर्त्यांची धोरणे
* १८९२ च्या कायद्याने केलेली निराशा
* राज्यकर्त्यांची अन्यायी कृत्ये व लॉर्ड कर्झनची दडपशाही कृत्ये
* बंगालची फाळणी
* हिंदू धर्म व संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाची चळवळ
* गोऱ्या लोकांची उद्दाम वृत्ती
* हिंदी सुशिक्षित बेकारीची समस्या
* लाल - बाल - पाल या त्रयीचे नेतृत्व

जहालवाद्यांचा कार्यक्रम
* इंग्रज राजकर्ते अर्ज व विनंती पद्धतीने वठणीवर येणार नाहीत, याबद्दल जहालवाद्याना तिळमात्र शंका नव्हती. त्यांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
* या आंदोलनातील बहिष्कार, स्वदेशी, व राष्ट्रीय शिक्षण हि महत्वाची साधने होती. बहिष्काराची व्याप्ती बरीच मोठी होती.
* कलकत्त्याचे The Englishman वर्तमानात ' न विकल्या गेलेल्या मालांनी कलकत्त्याच्या वखारी गच्च भरल्या आहेत. हे अगदी सत्य आहेत. अनेक मारवाडी संस्था बंद पडल्या आहेत. अनेक युरोपियन व्यापारी कंपन्यानी आपला व्यापार बंद ठेवला आहे किंवा तो जुजबी प्रमाणावर चालू आहे. इंग्रजी राज्याच्या शत्रूच्या हाती इंग्रजांच्या हिताचे नाश करणारे बहिष्काराच्या स्वरुपात अत्यंत प्रभावी हत्यार आलेले आहे हे खरे
* लाला लजपतराय आपल्या देशबांधवाना म्हणतात ' भिक्षेइतका इतर कोणत्याही गोष्टींचा तिरस्कार इंग्रज करत नाहीत, मला वाटते भिक मागणाऱ्यांचा तिरस्कार करावयास हवा, आम्ही भिक्षेकरी नाही हे इंग्रजांना आपण दाखवून दिले पाहिजे.


बंगालची फाळणी
* बंगाल प्रांत मोठा असल्या कारणाने त्याचा राज्यकारभार पाहणे शक्य नव्हते.
* लॉर्ड कर्झन हा मोठ्या तडफेचा गवर्नर होता.
* इंग्रजी राज्याशी दिवसेदिवस शत्रुत्व करणाऱ्या सुबुद्ध बंगाली लोकांचे ऐक्य भंग पावणार होते. हा एक राज्यकर्त्यांचा कुटील डाव होता. खेळण्याचे लॉर्ड कर्झनने ठरविले.
* सन १९०३ च्या प्रारंभास बंगालचा गवर्नर सर आंड्र्यू फ्रेझर याने कर्झनच्या आदेशाने फाळणीची योजना तयार केली. कर्झनने सर्वसाधारण अनुमती देवून योजना तयार केली.
* मे १९०५ मध्ये लंडनच्या standard या वर्तमानकाळात फाळणीस विलायत सरकारने मान्यता दिली हे प्रथम छापले.
* हिंदुस्तान सरकारने हि योजना ७ जुलै १९०५ मध्ये सिमल्याहून प्रसिद्ध केली.
* बंगाल प्रांतापासून चितगाव, डाक्का, व राजेशाही विभाग व माल्डा जिल्हा प्रदेश तोडून ते आसाम प्रांतास जोडले जातील. दार्जीलिंग बंगालमध्येच राहील.
* या नव्या प्रांताचे नाव पूर्व बंगाल व आसाम असे राहील. डाक्का हि त्याची राजधानी राहील. त्याचा कारभार ले गवर्नर पाहिलं.
* बंगाल प्रांताच्या पश्चिमेकडील काही प्रदेश व छोटा नागपूर भागातील पाच हिंदू संस्थाने बंगालपासून अलग केली जातील.
* बंगाल प्रांतापासून  झालेल्या नव्या पूर्व बंगाल प्रांतास मुसलमान बहुसंख्य होते. खुद्द बंगाल प्रांतात हिंदूची संख्या ४ कोटी व बंगाली हिंदूची संख्या १ कोटी ८० लाख होती.
* सुरेंद्रनाथ बनर्जी यांनी आपल्या ' The Bengalee ' या पत्रातून त्याच दिवशी बंगालमध्ये अभूतपूर्व लढा सुरु झाला. व ५० हजाराच्या सभा घेतल्या.
* जो पर्यंत बंगालची फाळणी रद्द होत नाही, तो पर्यंत बहिष्कार चळवळीस सरकारविरुद्ध पाठींबा व्यक्त करण्यात आले.
* बकिमचंद्र यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वन्दे मातरम हे गीत सगळ्यांच्या ओठावर होते.
* दोन बंगालमधील बंगाली लोकांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून ' फेडरेशन हॉल ' या भव्य इमारतीची पायाभरणी झाली.
* शेवटी हि फाळणी रद्द करण्याचा त्यांना निर्णय घ्यावा लागला. १२ डिसेंबर १९११ रोजी दिल्ली भव्य दरबार भरून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. आणि हिंदी
राष्ट्रवादी चळवळीचा हा पहिला विजय होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.