शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतातील १० शहरे - ७ डिसेंबर २०१८

जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतातील १० शहरे -  ७ डिसेंबर २०१८ 

* आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता पुढील दोन दशकात भारत वर्चस्व गाजवेल असे ऑक्सफर्ड इकॉनॉमिस्ट स्पष्ट केले आहे. 

* हिऱ्यांना पैलू पाडणारे आणि व्यापार केंद्र सुरत २०३५ पर्यंत सर्वात वेगाने विस्तारित होईल. त्याची सरासरी ९ टक्क्यापेक्षा अधिक असेल. असे ऑक्सफर्डचे जागतिक शहरे संशोधन विभागप्रमुख रिचर्ड होल्ट यांनी अहवालात म्हटले आहे. 

* याच कालावधीत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पाचव्या स्थानी आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतातील १० शहरे पुढीलप्रमाणे आहेत. १] सुरत ९.१७, २] आग्रा ८.५८, ३] बंगलोर ८.५, ४] हैद्राबाद ८.४७, ५] नागपूर ८.४१, ६] तिरपुर ८.३८, ७] राजकोट ८.३३, ८] तिरुचिरापल्ली ८.२९, ९] चेन्नई ८.१७, १०] विजयवाडा ८.१६. ही शहरे आहेत. 

* २०१९ मध्ये जागतिक जीडीपी वाढ ३.१ वरून २.८ आणि २०२० मध्ये २.७ पर्यंत कमी होईल. अलीकडे इक्विटी विक्रमी आर्थिक बाजारातील जोखीम अधोरेखित करतात. पण मोठ्या प्रमाणात बाजारात घट अपेक्षित नाही. 

* अमेरिकेच्या २०१९ मधील २.५ टक्के वाढीस समर्थन आहे. आर्थिक धोरणाचे प्रोत्साहन हे त्याचे कारण. मोठया प्रमाणात तेलाचे दर स्थिर, महागाई कमी करणे, नोकऱ्यांमधील लवचिकता या बाबी बाजाराच्या पुढील वर्षीच्या दृष्टिकोनाचे समर्थन करतात. 

* भारतातील टॉप टेन मधील बऱ्याच शहरामधील आर्थिक उत्पादन हे जगातील सर्वात मोठ्या महानगराच्या तुलनेत कमी असेल. 

* तसेच सर्व आशियाई शहरांचे एकत्रित सकल घरेलू उत्पादन २०२७ मध्ये एकत्रित केलेल्या सर्व उत्तर अमेरिकन आणि युरोपियन शहरापेक्षा अधिक असेल. २०३५ पर्यंत ते १७ टक्के होईल.

* चीनमधील शहरामधील त्यात अधिक वाटा असेल. त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालाच्या म्हणण्यानुसार २०३५ पर्यंत जगातील सर्वात मोठ्या शहरांच्या स्थानामध्ये बदल होईल. 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.