गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

इस्तंबूलमध्ये साकारला जगातील सर्वात मोठा विमानतळ - २२ नोव्हेंबर २०१८

इस्तंबूलमध्ये साकारला जगातील सर्वात मोठा विमानतळ - २२ नोव्हेंबर २०१८

* जगातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उदघाटन तुर्कस्तानमधील इस्तंबूलमध्ये नुकतेच झाले. याचे नामकरण [न्यू इस्तंबूल विमानतळ] असे करण्यात आले.

* उदघाटनाला तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यीप एर्डेगाण यांच्यासह १८ देशांचे नेते उपस्थित होते. या भव्य विमानतळावरून अनेक वादही झाले अडचणी झाल्या.

* याचे बांधकाम पूर्ण होण्यास १० वर्षाचा कालावधी लागला. यादरम्यान ३० लोकांचा मृत्यू झाला. २०२८ पासून येथून २० कोटी लोक प्रवास करतील. अशी अपेक्षा आहे.

* सध्या जगातील सर्वात व्यग्र विमानतळ अटलांटा विमानतळ असून तेथे १० कोटीपेक्षा जास्त लोक प्रवास करतात.

* विमानतळाचे वैशिष्ट्य - १९ हजार एकर एकूण क्षेत्र, २५० विमाने एकाच वेळी उड्डाण करतील, ३५० धावपट्या उपलब्द, ९ कोटी प्रवाशांची वार्षिक संख्या, १० वर्षे काम पूर्ण होण्याचा कालावधी, ३५ हजार बांधकामावरील कर्मचारी, ३ हजार अभियंत्यांचा सहभाग.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.