गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

युपीएसीच्या अध्यक्षपदी अरविंद सक्सेना यांची नियुक्ती - ३० नोव्हेंबर २०१८

युपीएसीच्या अध्यक्षपदी अरविंद सक्सेना यांची नियुक्ती - ३० नोव्हेंबर २०१८

* केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य युपीएससी अरविंद सक्सेना यांना या आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाळ ७ ऑगस्ट २०२० पर्यंत असेल.

* त्यांच्यापूर्वी विनय मित्तल हे युपीएससीचे अध्यक्ष होते. त्यांना २० जून २०१८ रोजी युपीएससीचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

* दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आयआयटी दिल्लीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ते १९७८ च्या बॅचचे भारतीय टपाल सेवा अधिकारी आहेत.

* यूपीएससीचे सदस्य म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते एव्हिएशन रिसर्च सेंटरचे एआरसी संचालक होते. ते टपाल सेवेमध्ये असताना अलीगढ मुद्रांक आणि सील कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी विशेष कार्याधिकारी होते.

* त्यांनी भारतीय गुप्तचर संस्था रॉ मध्येही कार्य केले आहे. त्यांना शेजारील देशांच्या धोरणात्मक विकास अभ्यासात तज्ञ मानले जाते.

* त्यांच्या सेवेदरम्यान त्यांना विशेष कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. २००५ मध्ये त्यांना मेरीटोरियस सेवा पुरस्कार आणि २०१२ मध्ये असाधारण सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

* युपीएससी आयोगात १ अध्यक्ष व १० अन्य सदस्य असतात ज्यांची नियुक्ती आणि बडतर्फीचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.