गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

विशेष चालू घडामोडी - १ ते २१ नोव्हेंबर २०१८

विशेष चालू घडामोडी - १ ते २१ नोव्हेंबर २०१८

* जगभरातील २१ व्या शतकातील विदेशी भाषातील [इंग्रजी वगळता] सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटामध्ये भारतातील ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांचा अतिशय गाजलेला पाथेर पांचालीला स्थान मिळाले. 

* ज्येष्ठ अभिनेते आणि विद्यमान नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांची राज्य शासनाच्या रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

* चीनने माहिती तंत्रज्ञानातील नवा अविष्कार जगासमोर आणला आहे. चीनमधील प्रमुख वृत्तसंस्था असलेल्या झिंहुआ ने कुत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वृत्तनिवेदकाकडून एआय रोबो ने बातमीपत्र सादर केले.

* स्टार भारतीय मल्ल बजरंग पुनिया याने शनिवारी ६५ किलो वजन गटात जागतिक जागतिक कुस्ती क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे.

* स्मार्टफोन खरेदीमध्ये भारताने जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही पिछाडीवर टाकले आहे. स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 

* गुंतवणूकदारांना सेवा सुविधा देऊन तब्बल ८३ हजार २३६ कोटींचे गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या कर्नाटकाने गुजरात आणि महाराष्ट्रावर मात करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

* देशातील पहिल्या वाराणसी-हल्दिया राष्ट्रीय जलमार्ग १ वर उभारणी करून देशातील पहिल्या मल्टिमोडल टर्मिनलचे उदघाटन करण्यात आले.

* जगात सर्वात जास्त सायबर हल्ले झालेल्या देशामध्ये भारताचा क्रमांक २१ वा आहे. यंदा सहा महिन्यात भारतावर ६.९५ लाख झाले आहेत. 

* भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पु. ल. देशपांडे स्मृती सन्मान तर प्रतिभावान संगीतकार हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

* फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर कृष्णमूर्ती फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतील.

* केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री तथा भाजपनेते अनंत कुमार यांचे सोमवारी बंगळुरूतील एका खासगी दवाखान्यात निधन झाले.

* श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ने जीसॅट २९ या आतापर्यंतच्या सर्वात वजनदार भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 

* मार्वल कॉमिक्सचे संस्थापक आणि स्पायडरमॅन, हल्क, आयर्नमॅन यासारख्या सुपरहिरोचे दीर्घ आजाराने निधन झाले. 

* येत्या २६ जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

* भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवाणी याने गुरुवारी बिलिडियर्सच्या सर्वात लहान प्रकारात आयबीएसएफ जेतेपदाची हॅट्रिक साधली आहे.

* देशभरात करण्यात आलेल्या कौशल्य सर्वेक्षणात आंध्रप्रदेश हे सर्वाधिक रोजगारक्षम राज्य ठरले आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.  शहरांच्या बाबतीत बंगलोर सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर चेन्नई, गुंटूर, लखनौ, मुंबई, नवी दिल्ली, नाशिक, ठाणे, पुणे यांचा क्रमांक लागतो.

* या वर्षी जागतिक बुध्यांकन यादीत भारताची २ अंक घसरण झाली असून भारताला यंदा या यादीत ५३ नाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. स्वित्झर्लंड या यादीत आपले पहिले स्थानावर आहे.

* अंगद वीर सिंग बाजवा आठव्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष गटातील स्किट प्रकारच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमी कामगिरी करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा तो पहिला भारतीय स्किट नेमबाज ठरला.

* दक्षिण कोरियाचे किम जोंग यांना इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्ह्णून निवडण्यात आले असून त्यांच्या विरोधात रशियन अधिकाऱ्याचा या पदासाठीच्या लढतीत किम यांनी पराभव केल्याने पाश्चिमात्य देशांनी सुटकेचा श्वास टाकला. ते २०२० पर्यंत कार्यपदावर राहतील. 

1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.