सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

भारतात ४ व्यक्तीपैकी एक मनोरुग्ण WHO चा अहवाल - ८ ऑक्टोबर २०१८

भारतात ४ व्यक्तीपैकी एक मनोरुग्ण WHO चा अहवाल - ८ ऑक्टोबर २०१८

* धावपळीच्या जीवनात आणि आधुनिक जीवनशैलीच्या मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तरुण वयात अनेकजण आत्महत्या करतात किंवा गंभीर मानसिक आजाराला बळी पडतात.

* जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्लूएचओच्या अहवालानुसार भारतात मानसिक आजारांना सामना करत असलेल्या ५०% व्यक्ती किशोरवयीन आहेत.

* अहवालानुसार मानसिक आजाराने पीडितांपैकी ५०% नागरिकांना हा आजार किशोर वयात ग्रासतो तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचे तारुण्यात गंभीर परिणाम समोर येतात.

* आज अधिक सेल्फी घेणे हा सुद्धा एक आजार आहे. याला सेल्फाइटिस नाव देण्यात आले आहे. इंटरनेट, ऑनलाईन खेळ, सोशल मीडियावर तासंनतास सक्रिय राहणे किंवा अन्य व्यसनामुळे व्यवहारात अचानक परिवर्तन येणे किंवा अन्य व्यसनामुळे व्यवहारात अचानक परिवर्तन येणे याला मानसिक आजाराच्या श्रेणीत ठेवले जाते. 

* प्रत्येक चार व्यक्तीपैकी एक जण मानसिक आजाराने पीडित आहे. ५०टक्के रुग्णात १४ व्या वर्षांपासून आजाराची सुरुवात होते. मुलावर अभ्यासाचा दबाव हेही मानसिक त्रासाचे कारण बनत आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.