शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

चंदा कोचर ICICI च्या सीईओ पदावरून पायउतार - ५ ऑक्टोबर २०१८

चंदा कोचर ICICI च्या सीईओ पदावरून पायउतार - ५ ऑक्टोबर २०१८

* चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाला लाभ मिळवून दिल्याचा आरोपामुळे वादात सापडलेल्या कोचर यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या आधीच पद सोडावे लागले.

* मुदतीपूर्वीच निवृत्त होण्याची विनंती कोचर यांनी केली होती. ती स्वीकारण्यात आली आहे. असे बँकेच्या बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.  ५७ वर्षीय चंदा कोचर यांनी बँकेच्या सर्व उपकंपन्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

* आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या त्या चेअरमन होत्या हे पदही त्यांनी सोडले आहे. बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की मे महिन्यात कोचर यांच्याविरुद्धबाह्य चौकशी सुरु करण्यात आली. ती सुरूच राहिल.

* सध्या बँकेच्या बोर्डाने बँकेचे मुख्य परिचालन अधिकारी सीईओ संदीप बक्षी यांना पदोन्नती देऊन व्यवस्थापकीय संचालक व सीईओ केले. ते पुढील पाच वर्षे म्हणजेच ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत हे पद सांभाळतील.

* बक्षी हे मेकॅनिकल इंजिनिअर असून आयसीआयसीआय लिमिटेडमधून १९८६ मध्ये त्यांनी आपले करिअर सुरु केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.