रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

कोकणच्या हापूस जीआय मानांकन - ६ ऑक्टोबर २०१८

कोकणच्या हापूस जीआय मानांकन - ६ ऑक्टोबर २०१८

* वैशिष्ट्यपूर्ण रंग, गंध आणि चव यामुळे जगभरात मागणी असलेल्या कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याला जीआय मानांकन [जिऑग्राफिकल इंडिकेशन] मानांकन मिळाले आहे.

* १० वर्षापासनची ही मागणी न्यायिक प्रक्रियेत अडकली होती. हापूसचे मातृस्थान कोकण असल्याच्या मुद्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याने हापूसचा भाव वाढेल. हे निश्चित झाले आहे.

* देवगड किंवा रत्नागिरी असे स्वतंत्र मानांकन न करता कोकण हापूस असे मानांकन देण्यात आल्याने दोन्ही ठिकाणच्या आंबा उत्पादकांना फायदेशीर ठरेल.

* देवगड तालुका आंबा उत्पादक संघ आणि केळशी आंबा उत्पादक संघ यांच्याबरोबरच दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून ही मागणी झाली होती.

* मात्र या मुद्यांबाबत काही लोकांनी आक्षेप घेतल्याने विद्यापीठाने २२ सप्टेंबर २००८ ला पाठविलेला प्रस्ताव न्यायिक प्रक्रियेत अडकला होता.

* अखेर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कंट्रोलर जनरल पेटंट्स डिझाईन, ट्रेडमार्क या भारत सरकारच्या नोंदणीकृत संस्थेकडून कोकण हापूसला जीआय प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

* आतापर्यंत देशातील १३८ कृषी उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहेत. कोकणातील काजू, कोकम व चिकू या तीन उत्पादनांचा समावेश होता.

* कोकणातील चौथे मानांकन प्राप्त उत्पादन हापूसचा मानांकन क्रमांक १३९ वा आहे. हॉल मार्कप्रमाणे आता हापूससाठी विशेष जीआय लोगो तयार करण्यात येणार आहे.

* तो उत्पादनांवर लावण्यात आल्याने जीआय उत्पादन कोणते हे ग्राहकांना कळेल आणि त्याला तसा दरही मिळेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.