मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

अजित दोवाल एसपीजीचे प्रमुख - ९ ऑक्टोबर २०१८

अजित दोवाल एसपीजीचे प्रमुख - ९ ऑक्टोबर २०१८

* राष्ट्रीय सुरक्षा परिषदेअंतर्गत स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपची एसपीजी स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

* राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला सुरक्षा परिषदेला सुरक्षा रणनीती आणि दीर्घकालीन संरक्षणविषयक रणनीतीबाबत सल्ला देणे ही या पुनरुज्जीवीत करण्यात आलेल्या गटाची मुख्य जबाबदारी असेल.

* राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे या गटाचे प्रमुख राहतील. यामुळे आता ते देशातले एक सामर्थ्यवान नोकरशहा म्हणून ओळखले जातील.

* राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरणनिर्मितीसाठी विविध मंत्रालयाकडून येणाऱ्या माहितीचा समन्वय व एकत्रीकरण साधण्याची प्रमुख यंत्रणा म्हणून हा गट काम करणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.