बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

तुषार मेहता नवीन सॉलिसिटर जनरल - ११ ऑक्टोबर २०१८

तुषार मेहता नवीन सॉलिसिटर जनरल - ११ ऑक्टोबर २०१८

* अखेर वर्षभराची प्रतीक्षा संपली असून मोदी सरकारने सॉलिसिटर जनरल या पदावर तुषार मेहता यांची नियुक्ती केली आहे. मागील ४ वर्षांपासून ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर कार्यरत असून मागील वर्षी ऑक्टोबर रणजित कुमार त्यांनी हे पद सोडल्यापासून रिक्त होते.

* परंतु कुमार यांच्यानंतर हे पद कोणाला द्यायचे यावरून भाजपमध्ये मतभेद असल्याने ही नियुक्ती लांबणीवर पडली होती.

* तुषार मेहता हे गुजराती असल्यामुळे व त्यांनी अनेक संवेदनशील खटले हाताळलेले असल्यामुळे त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी भाजप आग्रही होते.

* सुप्रीम कोर्टात सरकारचे सहा अतिरिक्त सॉलिसिटर जरनल आहेत. मनिंदर सिंग, आत्माराम नाडकर्णी, पिंकी आनंद, विक्रमजीत बॅनर्जी, अमन लेखी व संदीप सेठी, रणजित कुमार यांनी राजीनामा दिल्यावर ही नावे चर्चेत होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.