बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

ऍना बर्नस यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार जाहीर - १७ ऑक्टोबर २०१८

ऍना बर्नस यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार जाहीर - १७ ऑक्टोबर २०१८

* इंग्रजी ग्रंथविश्वात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'मॅन बुकर' पुरस्काराची लघूयादी २० सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती. आज पुरस्काराच्या विजेत्यांचे नाव लंडनमध्ये जाहीर करण्यात आले.

* उत्तर आयर्लंडच्या ५६ वर्षीय लेखिका ऍना बर्नस यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला आहे.

* अनुवादित इंग्रजी पुस्तकासाठी हा पुरस्कार दिला जातो. ऍना बर्नस यांच्या 'मिल्कमन' या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे.

* ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन, डेझी जॉन्सन, अमेरिकी लेखक निक डनासो, मायकेल ओदांशी, अमेरिकी लेखिका रेचल कुशनेर आणि कॅनडियन लेखिका इसाय यांना पिछाडीवर टाकत ५० हजार पौंडाचा हा पुरस्कार पटकावला आहे.

* अनुवादित इंग्रजी पुस्तकासाठी २००५ पासून दर २ वर्षांनी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१६ पासून वार्षिक झाला.

* ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रह हा पुरस्कार दिला जातो. मूळ लेखकाइतकेच अनुवादकालाही महत्व देणाऱ्या या पुरस्काराची ५० हजार पौंड इतकी घसघशीत रक्कम लेखक अनुवाद्कामध्ये समसमान विभागून दिली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.