रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

मॅरिसे कोण्डे यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्रदान - १४ ऑक्टोबर २०१८

मॅरिसे कोण्डे यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्रदान - १४ ऑक्टोबर २०१८

* कॅरेबियन बेटसमूहात वसलेल्या ग्वाडेलोपमधील साहित्यिका मॅरिसे कोण्डे यांना यंदाचा साहित्यातील पर्यायी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

* नोबेल अकादमीने यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार न देण्याची घोषणा केल्यानंतर स्वीडनमधील १०० हुन अधिक मान्यवरांनी एकत्र येत पर्यायी साहित्य नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली.

* मॅरिसे यांना यंदाचा साहित्यातील न्यू अकादमी पुरस्कार मिळणार आहे. पुरस्कार स्वरूपात ८७ हजार पौंड म्हणजेच जवळपास ८४ लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.

* वर्गणीच्या माध्यमातून ही रक्कम मिळणार आहे. नोबेल पुरस्कार वितरणाच्या एक दिवस आधी म्हणजेच येत्या ९ डिसेंबर रोजी कोंडे यांना प्रदान केला जाईल.

* कोंडे यांच्यासह जपानचे साहित्यिक हारुकी मुराकामी, ब्रिटिश साहित्यिक नील गैमॅन आणि कॅनेडियन साहित्यिक किम थुय या तिघांनाही पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.