सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

राज्यात हुक्का पार्लरवर बंदी - ८ ऑक्टोबर २०१८

राज्यात हुक्का पार्लरवर बंदी - ८ ऑक्टोबर २०१८

* महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी संमतीची मोहोर उमटल्याने गृहविभागाने तातडीने अधिसूचना जारी केली आहे.

* त्यामुळे राज्यात हुक्का पार्लरवर बंदी लागू झाली आहे. सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम २००३ कायद्याने ही बंदी लागू झाली असून त्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

* सप्टेंबर अखेरीस राष्ट्रपतींची या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी गृहविभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली.

* हुक्का पार्लरवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. त्याच्याआधी गुजरातने अशी बंदी घातली आहे. २०१० साली मुंबई महापालिकेने रेस्टोरंट, विडी, हुक्कावर बंदी घातली आहे.

* मात्र २०१४ सर्वोच्च न्यायालयाचे या बंदीविरोधात निर्णय दिला. तेव्हापासून हुक्का पार्लरवरील बंदी अथवा नियंत्रणाबाबत कायदेशीर तरतुदीची मागणी करण्यात येत होती.

* अखेर कमला मिल दुर्घटनेनंतर केलेल्या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी दिल्याने हुक्काबंदी लागू झाली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.