पॅराआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला ५ सुवर्ण - १२ ऑक्टोबर २०१८
* पॅराआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांची लयलूट शुक्रवारीही कायम राखताना तब्बल पाच सुवर्णपदके जिंकली. बुद्धिबळमध्ये के जेनिथा अँटो आणि किशन गांगोली, भालाफेकीत नीरज यादव, क्लब थ्रो प्रकारात अमित कुमार आणि बॅडमिंटनमध्ये पारुल परमारने सुवर्णपदकावर नाव कोरले.
* जेनिथा जलद पी १ बुद्धिबळ प्रकारातील अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या मनुरंग रोझलिंडावर १-० अशी सरशी केली. किशनने पुरुष एकेरीतील जलद व्ही-बी २/३ प्रकारात मजीद बघेरीवर मात करून विजेतेपद मिळवले.
* बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पारूलने थायलंडच्या वॅडी कामतला २१-९, २१-५ असे हरविले.
* पुरुषाच्या भालाफेकीत नीरजने एफ ५५ प्रकारात सर्वाधिक २९.२४ मीटर अंतरासह सुवर्णाला गवसणी घातली. पुरुषांच्या क्लब थ्रो प्रकारात भारताच्या अमित कुमार २९.४७ मीटर अंतरासह सुवर्णपदक मिळवले.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा