शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

कुलगोड ठरले देशातील सर्वात विकसित गाव - १९ ऑक्टोबर २०१८

कुलगोड ठरले देशातील सर्वात विकसित गाव - १९ ऑक्टोबर २०१८

* केंद्र सरकारच्या अंत्योदय योजनेअंतर्गत देशातील सर्वाधिक विकसित गावाचा पुरस्कार कर्नाटकातील कुलगोड या गावाला मिळाला आहे. १०० पैकी ९४ गुण मिळणारे हे गाव बेळगावमध्ये आहे.

* घटप्रभा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे गाव स्वच्छ म्हणून ओळखले जाते. चहूबाजूने हिरवळीने व्यापलेल्या या गावाला पायाभूत सुविधा, आर्थिक समावेश, महिला सशक्तीकरण, आरोग्य आणि शिक्षणासह ४७ बाबीत उच्च गुण मिळाले आहेत.

* ग्रामपंचायतीचे सुसज्ज कार्यालय, दोन राष्ट्रीय बँका, बीएसएनएल केंद्र, सरकारी प्राथमिक शाळा, तीन खासगी शाळा, विद्युत ग्राहक सेवा केंद्र, पशु वैद्यकीय रुग्णालय आणि एटीएमही आहे.

* ७ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात ५,२०० मतदार आहेत. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे.  दहावीच्या पुढील शिक्षणासाठी ६ किलोमीटर दूर असलेल्या महाविद्यालयात मुले जातात.

* तेथे जाण्यासाठी त्यांना बससेवा आहे. दरम्यान गावातील नागरिकांची स्वच्छता अभियानाला गंभीरपणे घेतले. नागरिक एका पीयूसी महाविद्यालयाची मागणी करत आहेत.

* गावात राहणारे सुभाष बेनाकप्पा वंतागोडी हे एक शेतकरी आहेत. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये गावाला घेतील आणि गावच्या दौऱ्यावर येतील कोणाला वाटले नव्हते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.