सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला उपविजेतेपद - २३ ऑक्टोबर २०१८

डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला उपविजेतेपद - २३ ऑक्टोबर २०१८

* डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या फुलराणीचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न साकार झाले नाही. भारताच्या सायना नेहवालला अंतिम फेरीत तैवानच्या ताई झू यिंगने २१०१३, १३-२१, २१-६ असे पराभूत केले.

* जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या यिंगला सायनाने चांगली लढत दिली. मात्र अखेरीस तिला तीन सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

* सायना नेहवाल आणि ताई झू यिंग यांच्यामध्ये झालेल्या आतापर्यंतच्या लढतीत यिंगने बाजी मारली होती. नुकत्याच जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळामध्येही यिंगने बाजी मारली आहे.

* २०१३ साली झालेल्या स्विस ओपन स्पर्धेत सायनाने यिंगला पराभवाचे पाणी पाजले होते. यानंतर सायना नेहवाल यिंगविरोधात एकही सामना जिंकू शकलेली नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.