रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

एस-४०० क्षेपणास्त्रासह भारत रशियात ८ करार - ७ सप्टेंबर २०१८

एस-४०० क्षेपणास्त्रासह भारत रशियात ८ करार - ७ सप्टेंबर २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लाडिनीर पुतीन यांच्यातील चर्चेनंतर शुक्रवारी भारत व रशियामध्ये आठ महत्वाचे करार झाले. त्यात रशियामध्ये आठ महत्वाचे करार झाले.

* त्यात रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्रे खरेदी करण्याबाबतच्या कराराचाही समावेश आहे. हा व्यवहार केल्यास निर्बंधाच्या अमेरिकेने दिलेल्या धमकीला भारताने जुमानले नाही.

* भारत व रशियाच्या १९ व्या वार्षिक शिखर बैठकीत पुतीन व मोदी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतून दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत झाले आहेत.

* अंतराळ संशोधन, अणुऊर्जा, रेल्वेयंत्रणेचा विकास अशा काही क्षेत्रासाठी सहकार्य करार करण्यात आले. रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी भारताला ५ अब्ज डॉलर मोजावे लागणार आहेत.

* जमिनीवरून हवेत मारा करणारी व अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेली ही क्षेपणास्त्रे आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.