बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक पंडित डी के दातार यांचे निधन - १० ऑक्टोबर २०१८

जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक पंडित डी के दातार यांचे निधन - १० ऑक्टोबर २०१८

* जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक पंडित डी के दातार यांचे बुधवारी रात्री अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि डॉ निखिल व डॉ शेखर ही मुले सुना असा परिवार आहे.

* गायकी अंगाने व्हायोलिन वादन करणारे एक अतिशय वरच्या दर्जाचे कलावंत म्हणून ते प्रसिद्ध होते. भारतीय अभिजात संगीतात सर्वात जुन्या अश्या ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होते.

* वाद्य शिकण्यासाठी त्याकाळी ते मुंबईत प्रसिद्ध असलेल्या प्रो. बी. आर देवधर यांच्या स्कुल ऑफ म्युझियममध्ये ते दाखल झाले. आणि ख्यातनाम व्हायोलिनवादक विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडून त्यांनी तालीम घ्यायला सुरुवात केली.

* भारत सरकारने त्यांना पदमश्री या पुरस्काराने गौरविले. तर संगीत नाटक अकादमीचा आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला.

* त्या ठिकाणी त्यांच्या वादनाचे कार्यक्रम गेली अनेक दशके आवर्जून आयोजित करण्यात येत असत. भारतातील अनेक विद्यापीठामध्ये पं दातार अध्यापन करीत असत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.