सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला रौप्यपदक - २३ ऑक्टोबर २०१८

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला रौप्यपदक - २३ ऑक्टोबर २०१८

* जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला रौप्यपदक पटकवले आहे. ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभव झाल्याने पुनियाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.

* मात्र या रौप्य पदकासह मानाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदक पटकाविणारा पुनिया हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

* २०१३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या बजरंगला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ५ वर्षाचा कालावधी लागला.

* ६५ किलो वजनी गटात त्याच्यावर भारताची भिस्त होती. पुनियानेही चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश घेतला.

* राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत त्याने त्या सहजतेने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे या स्पर्धेतही तो पदकासाठी दावेदार मानला जात होता.

* अंतिम फेरीत त्याचा सामना जपानच्या मल्लाशी होता. या सामन्यात ताकूटो ओटूगारोने पुनियाचा १६-९ ने पराभव केला पुनियाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.

* दरम्यान भारताकडून आतापर्यंत सुशीलकुमारने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. २०१० साली मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात सुशीलकुमारने सुवर्णपदक पटकावलं होत.

* यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पथकाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.