मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचे सुवर्णयश - ९ ऑक्टोबर २०१८

पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचे सुवर्णयश - ९ ऑक्टोबर २०१८

* एकता भयानने पॅरा आशियाई स्पर्धेत महिलांच्या क्लब थ्रोमध्ये भारताला चौथे सुवर्णपदक पटकावून दिले. त्याचप्रमाणे पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये नारायण ठाकूर याने जबरदस्त वर्चस्व राखताना सुवर्ण पदकावर कब्जा केला.

* या शानदार कामगिरीसह भारताने मंगळवारी तीन सुवर्णासह ११ पदकांची कमाई केली. याआधी मनीष नरवाल याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला.

* युवा नेमबाज मनू भाकरने अपेक्षित कामगिरी करताना मंगळवारी युथ ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.

* भारोत्तोलन जेरेमी लालरिनूगाने युथ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पाहिले सुवर्णपदक पटकावून दिले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.