मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

युवा ऑलिम्पिकसाठी मनू भाकर ध्वजधारक - ३ ऑक्टोबर २०१८

युवा ऑलिम्पिकसाठी मनू भाकर ध्वजधारक - ३ ऑक्टोबर २०१८

* युवा नेमबाज मनू भाकर हिची युवा ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाची ध्वजधारक म्हणून निवड करण्यात आली.

* ही स्पर्धा ६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान अर्जेंटिनात ब्युनोस आयर्स येथे होणार आहे. भारतीय संघाच्या निरोप समारंभात ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी ही घोषणा केली.

* हा माझा सन्मान असून भारतीय संघाचा ध्वजधारक बनेन असे कधीच वाटले नव्हते. अशी प्रतिक्रिया मनूने व्यक्त केली आहे.

* भारतीय संघ १३ क्रीडाप्रकारात  सहभागी होईल. गोव्याचे गुरुदत्त भक्त हे पथक प्रमुख असतील. भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देताना क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी भारतीय खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून परततील असा विश्वास आहे.

* तुम्ही देशाचे राजदूत आहात. देशाची प्रतिमा खालावणार नाही असे वर्तन आणि कामगिरी करा. भारतीय संघ नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमिंटन, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, रोईंग, बॉक्सिंग, ज्युडो, स्पोर्ट क्लाइम्बिंग, अशा क्रीडा प्रकारात सहभागी होतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.