सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

नॉर्डहौस व रोमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर - ८ ऑक्टोबर २०१८

नॉर्डहौस व रोमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर - ८ ऑक्टोबर २०१८

* आर्थिक विकासाची सांगड पर्यावरण आणि संशोधन यांच्याशी घालणारे अमेरिकी अर्थतज्ञ विल्यम नॉर्डहौस आणि पॉल रोमर यांना २०१८ सालचा अर्थशास्त्रीसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

* आपण दीर्घकाळ टिकणारा विकास कसा साधू शकतो या सध्याच्या सर्वात मूलभूत प्रश्नावर उत्तर शोधण्याचा या दोन्ही तज्ञानी प्रयत्न केल्याचे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस ने पुरस्कार जाहीर करताना सांगितले.

* विल्यम नॉर्डहौस वय ७७ येल विद्यापीठात, तर पॉल रोमर वय ६२ हे न्यूयॉर्क विद्यापीठाचा स्टर्न ऑफ बिझनेस प्राध्यापक आहेत. रोमर हे जागतिक बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ञ आहेत.

* बाजाराचे अर्थशास्त्रज्ञ हे पर्यावरण आणि ज्ञानाशी कसे निगडित असते हे समजून सांगणारे प्रारूप तयार करून या दोन्ही अर्थतज्ञानी आर्थिक विश्लेषणाचा आवाका वाढविला असे निवड समितीने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

* दीर्घकालीन सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात पर्यावरण बदलाचा समावेश केल्याबद्दल नॉर्डहौस यांना तर अशा विश्लेषणात तांत्रिक संशोधनाचा समावेश केल्याबद्दल रोमर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

* या दोघांना मिळून सुमारे नव्वद लाख स्वीडिश क्रोनोर म्हणजेच सुमारे १० लाख डॉलर मिळणार आहेत. हा पुरस्कार स्टोकहोम येथे देण्यात येणार आहे.

* नोबेल पुरस्काराची वितरणाची सुरुवात १९०१ मध्ये झाली असली तरी स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार ते सुरु करण्यात आले आहे.

* तर अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार १९६९ पासून देण्यात आले आहेत. स्वीडनच्या रिक्सबँकेला तीनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अर्थशास्त्र या विषयातील नोबेल सुरु करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.