सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

देशात आयआयटी मुंबई सर्वोत्तम शिक्षणसंस्था - १५ ऑक्टोबर २०१८

देशात आयआयटी मुंबई सर्वोत्तम शिक्षणसंस्था - १५ ऑक्टोबर २०१८

* शिक्षण क्षेत्रातील क्यूएस [क्वाकक्वारेली सायमंड] या ब्रिटिश कंपनीने केलेल्या भारतीय शिक्षणसंस्थांच्या मूल्यमापनात आयआयटी-मुंबईला सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे. 

* तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू, दुसऱ्या क्रमांकावर आणि आयआयटी मद्रास तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

* विशेष म्हणजे याच कंपनीने यापूर्वी केलेल्या जागतिक पाहणीत भारतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूला सर्वात चांगले मानांकन मिळाले आहे. 

* या विरोधाभासावर स्पष्टीकरण देताना कंपनीच्या जनसंवाद विभागाच्या संचालिका सिमोना बिझोझिरो यांनी सांगितले की जागतिक आणि भारतीय पातळीवर शिक्षणसंस्थांच्या मानांकनासाठी वापरलेले निकष वेगवेगळे होते. 

* जागतिक पातळीवर शिक्षण संस्थांना मानांकन देताना संस्थेच्या शैक्षणिक नावलौकिक किंवा प्रतिष्ठेसाठी ४० टक्के गुण होते. तर भारतीय पातळीवर याच बाबीसाठी ३० टक्के गुण होते. 

* याचे मूल्यांकन होत असताना शैक्षणिक लौकिकासाठी ३०% नोकऱ्या, नोकऱ्या देणाऱ्या लौकिकासाठी २०%, प्राध्यापक व विद्यार्थी गुणोत्तर २०%, एकूण कर्मचाऱ्यांमध्ये पीएचडीधारक कर्मचाऱ्यांच्या प्रमाण साठी १०%, अशा अनेक विभागानुसार गूण विभागणी केली होती. 

* क्यूएस ही एक ब्रिटिश कंपनी असून विविध खंडातील विद्यापीठाचे मुल्याकंन जाहीर करते. जगभरातील विद्यापीठामध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोइसुविधा, लोकप्रियता अशा अनेक बाबी तपासून मुल्याकंन जाहीर केले जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.