शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

नरेंद्र मोदी यांना यूएनचा 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' चा पुरस्कार - ५ ऑक्टोबर २०१८

नरेंद्र मोदी यांना यूएनचा 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' चा पुरस्कार - ५ ऑक्टोबर २०१८

* नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाने त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार चॅम्पियन ऑफ द अर्थ ने सन्मानित केले आहे. 

* हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणात्मक नेतृत्वाच्या भूमिकेतून केलेल्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

* भारताने केलेले पर्यावरणीय कार्य 

* आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य - पर्यावरण पूरक आणि स्वच्छ सौर ऊर्जेचा पर्याय वापरून हवामान बदलाचा सामना करण्याच्या जागतिक सहकार्याचा रचनाकार आणि नेता म्हणून भारताची भूमिका. 

* एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचे देशातून पूर्ण उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार राबवत असलेल्या उपक्रमांचे संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केले आहे. 

* कोप २१ च्या यशस्वीतेसाठी भारताने केलेले प्रयत्न आणि नेतृत्वाचे जगभर कौतुक झाले.  नवीनीकरणीय म्हणजेच अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. 

* अहमदाबाद मध्ये राबविलेल्या बहूआयामी योजनेमुळे प्रदूषण मोठया प्रमाणात कमी झाले. गुजरातमध्ये राबविलेल्या पर्यावरणपूरक धोरणामुळे गुजरात अक्षय ऊर्जा निर्मितीचे केंद्र झाला.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.