शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१८ - ५ ऑक्टोबर २०१८

रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१८ - ५ ऑक्टोबर २०१८

* उत्क्रांतीच्या शक्तीचा वापर करून नवी प्रथिने निर्माण करणाऱ्या संशोधनाला या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या प्रथिनांचा वापर जैवइंधनापासून औषधे आणि इतर उपचारामध्ये करता येणे शक्य नाही.

* फ्रान्सेस एच अरनॉल्ड, जॉर्ज पी स्मिथ आणि सर ग्रेगरी पी विंटर या तिघांचा या वर्षीचे रसायनशास्त्राचे नोबेल रॉयल स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले. डार्विन यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांताचा वापर प्रत्यक्ष परीक्षानळीत करून नवी प्रथिने तयार करण्याचे काम या तिघा शास्त्रज्ञानी केले.

* या शास्त्रज्ञानी विकसित केलेल्या पद्धतीमुळे नवी एन्झाईम आणि नवीन प्रतिबिंड [अँटीबॉडी] तयार करणे शक्य झाले. त्यामुळे पर्यावरणस्न्हेही रसायनउद्योगाकडे वाटचाल करणे शक्य होईल.

* तसेच विविध आजारावर उपचार करून मानवी जीवन अधिक समृद्ध करता येऊ शकेल. असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. अरनॉल्ड हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजीमध्ये कार्यरत आहेत.

* स्मिथ हे मिसूरी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी फेज डिस्प्ले ही पद्धत विकसित केली त्याद्वारे नवी प्रथिने निर्माण करणे शक्य झाले. सर विंटर हे ब्रिटनमधील केम्ब्रीज विद्यापीठात कार्यरत आहेत.

* त्यांनी नव्या अँटीबॉडी शोधून काढल्या. त्याचा उद्देश नवी औषधें तयार करण्यासाठी होता. या अँटीबॉडीजच्या सहाय्याने विषद्रव्यांचा प्रभाव नष्ट करता येऊ शकतो.

* पुरस्कार्थीना ९० लाख स्वीडिश क्रोनर देण्यात येणार आहेत. त्यापैकी निम्मी रक्कम स्मिथ आणि विंटर यांना विभागून देण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.