सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

चीन हॉंगकॉंग दरम्यान जगातील सर्वात लांब पूल - २२ ऑक्टोबर २०१८

चीन हॉंगकॉंग दरम्यान जगातील सर्वात लांब पूल - २२ ऑक्टोबर २०१८

* संपूर्ण जगात आश्यर्य व्यक्त होईल अशी अनेक कामे, प्रकल्प व शोध चीनने लावले आहेत. तसेच एक आश्यर्य असलेल्या चीन आणि हाँगकाँग दरम्यान बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात लांब सागरी पुलाचे लोकार्पण बुधवारी होणार असल्याची माहिती आहे.

* या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सागरी पूल तब्बल ५५ किलोमीटर लांब आहे. हाँगकाँग-झुहैई-मकाऊ असे नाव असलेल्या या पुलाच्या बांधकामास २००९ मध्ये प्रारंभ करण्यात आला होता. हा पूल रिव्हर इस्टुरीवर बांधण्यात आला आहे.

* या पुलामुळे हाँगकाँग आणि चीनमधील झुहैई शहरातील अंतर तीन तासाऐवजी अवघ्या ३० मिनिटात पूर्ण होणार आहे. यामुळे अडीच तासांचा वेळ वाचणार आहे.

* या पुलाची एकूण लांबी ५५ किमी असून यातील तब्बल ३५ किमी पूल समुद्रावर बांधण्यात आला आहे. या पुलावरून ताशी १०० किमी वेगाने वाहने धावणार आहेत.

* पूल तयार होण्यास सुमारे ९ वर्षाचा कालावधी लागला. जगातील सर्वात लांब असलेल्या या पुलासाठी तब्बल चार लाख टन पोलादाचा वापर करण्यात आला.

* तसेच या प्रकल्पास सुमारे १०.७ अब्ज डॉलर्स इतका खर्च आला आहे. उल्लेखनीय म्हणजे या पुलाचा सुमारे ६.७ किमी भाग हा पाण्याखाली म्हणजे सुरुंग आहे. हा पूल हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला गेला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.