बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

चालू घडामोडी २४ ते ३१ डिसेंबर २०१८

चालू घडामोडी २४ ते  २०१८

* भाजपचे राजस्थानमधील माजी नेते हनुमान बेनीवाल यांनी आज राष्ट्रीय लोकतांत्रिक आरएलपी या नव्या पक्षाची स्थापना केली.

* बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात येथील एका न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

* इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून सुमात्रा बेटाजवळील पाकल पिनांग शहराकडे निघालेले लायन एअरचे विमान सोमवारी सकाळी समुद्रात कोसळून केब्रिन क्रुसह विमानातील १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला.

* राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांच्या पक्षाने पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय  घेतल्यामुळे श्रीलंकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

* ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा महामंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते घेण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे.

* राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, आणि लातूर या बाजार समितीला आता राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्यात येईल.

* जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीय पासपोर्टने ६६ वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने ९ स्थानांची प्रगती केली आहे.

* व्यवसायसुलभ वातावरण निर्मिती अर्थात इझ ऑफ डुईंग बिझनेस मध्ये भारताची स्थिती आणखी सुधारली आहे. वर्षभरातच भारताने या श्रेणीत १०० वरून ७७ व्या स्थानी झेप घेतली.

* केंद्र सरकारने शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाचे ईडी हंगामी संचालक म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नेमणूक केली.

* विश्वविख्यात शिल्पकार पदमविभूषण राम सुतार यांनी शिल्पकलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी त्यांना २०१६ साठीचा प्रतिष्ठेचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे.

* आगामी ५ ते ६ वर्षात म्हणजेच २०२४-२५ पर्यंत  भारतातील हवाई वाहतूक बाजार ब्रिटनला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा बाजार बनेल.

* जगप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या हेल्थ केअर ५० या यादीत तीन भारतीय अमेरिकन नागरिकांचा समावेश झाला आहे. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा या यादीत समावेश केला जातो.

* कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापूर चपलेला जीआय टॅग जिऑग्राफिकल इंडेक्स मिळाला आहे.

* सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल २०२० सालानंतर भारतात बीएस-४ नियमांचे अनुपालन करणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर बंदी घालतानाच या वर्षांपासून फक्त बीएस ६ नियमांचे अनुपालन करणाऱ्या वाहनांची विक्री होईल.

* भारतीय रेल्वेने नवी दिल्लीला रेल्वेमार्गाने लडाखशी जोडण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे. हा रेल्वेमार्ग भारत चीन सीमेजवळ बांधण्यात येणार आहे. हा बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे मार्ग जगातील सर्वात उंचीवरील असेल. तो समुद्रसपाटीवरून ५३६० मीटर उंचीवर असेल.

* मल्याळम लेखक बेन्यामिन यांना साहित्यातील पहिला जेसीबी भारतीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

* सेहल वर्क जेवडे यांची इथीओपियाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या इथीयोपियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

* आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे.

* भारताची अव्वल कुस्तीपटू धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

* कृषी वैज्ञानिक प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना भारतीय अन्न व कृषी परिषदेचा पहिला विश्व कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे.

* भारतात पहिल्या इंजिनाविना धावणाऱ्या ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून या ट्रेनची चाचणी २९ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

* पेटीएमने पेटीएम बँकेचे सीईओ आणि एमडी म्ह्णून सतीश कुमार गुप्ता यांची नियुक्ती केली.

* सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक अलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत.

* भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार २०१८ जाहीर झाला.

* भारताची गुंतवणूक प्रोत्साहन संस्था इन्वेस्ट इंडिया ने शाश्वत विकासासाठीच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा उत्कृष्टता पुरस्कार जिंकला आहे.

* जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्ल बजरंग पुनियाला अंतिम सामन्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

* देशातील प्रतिष्टीत कायदेतज्ञ आणि वकील फली नरिमन यांना लोकप्रशासनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल १९ व्या लालबहादूर शास्त्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.