गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह विजयी - ४ ऑक्टोबर२०१८

इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह विजयी - ४ ऑक्टोबर २०१८

* इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पेट्रीऑटिक युनियन ऑफ कुर्दिस्तानचे पियूके उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दीस्तान डेमोक्रेटिक पक्षाचे केडीपी उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला.

* ५८ वर्षीय बरहम सालेह यांना २१९ तर फुआद यांना २२ मते मिळाली. बरह्म सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.

* दोन्ही पक्षामध्ये राष्ट्राध्यक्षपदी मोठी रस्सीखेच होती. परंतु निकाल एकतर्फी लागला. तसेच निकाल लागण्यासाठी उशीर झाला.

* २००३ नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत. पंतप्रधान शिया मुसलमान आणि संसदेचे सभापती सुन्नी समाजाचे आहेत.

* इराकची अखंडता आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालेह यांनी शपथग्रहणावेळी म्हटले. सरकार स्थापन करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षासाठी १५ दिवसांचा कालावधी असेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.